25 मार्चपासून लॉकडाऊनमुळे सध्या देशभरात 650 विमानं जमिनीवरच आहेत. गेल्या आठवड्यात मंत्रालयाने काही नियमावलीचा प्रस्ताव विमान कंपन्यांकडून घेतला होता. विमान प्रवासाच्या 2 तास आधी टर्मिनलवर रिपोर्टिंग, वेब-चेक इन अनिवार्य, त्याचप्रमाणे प्रवाशांना डिस्पोजेबल व्यक्तिगत सुरक्षा उपकरण देण्याच्या पर्यायांबाबत हा प्रस्ताव होता. (हे वाचा-लॉकडाऊनमध्ये छोट्या व्यवसायिकांसाठी खूशखबर! फेसबुक सुरू करणार 'ऑनलाइन दुकान') त्याचप्रमाणे विमानतळांवर थर्मल स्क्रिनिंग देखील आवश्यक राहील. प्रवाशांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणं देखील अनिवार्य राहील. इंडिगो आणि विस्ताराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही कंपन्या देशांतर्गत उड्डाणांसाठी बुकिंग करत आहेत. मात्र अद्याप स्पाइसजेट, इंडिगो, विस्तारा आणि गोएअरकडून बुकिंग सुरू करण्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सोमवारी भारतीय हवाई यात्री असोसिएशन (APAI) चे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर रेड्डी यांनी बुकिंग सुरू करण्यासाठी काही एअरलाइन कंपन्यांवर टीका केली आहे. संपादन - जान्हवी भाटकरIt is not upto @MoCA_GoI or centre alone to decide on resuming domestic flights.
In the spirit of cooperative federalism, the govt of states where these flights will take off & land should be ready to allow civil aviation operations.@DGCAIndia @AAI_Official @PIB_India — Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) May 19, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.