• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Reliance चे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर, 46 टक्के वाढीसह तब्बल 15,479 कोटींचा नफा

Reliance चे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर, 46 टक्के वाढीसह तब्बल 15,479 कोटींचा नफा

रिलायन्स इंडिया लिमिटेड या कंपनीनं (Reliance India Ltd declares Quarter 2 results)चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 22 ऑक्टोबर : रिलायन्स इंडिया लिमिटेड या कंपनीनं (Reliance India Ltd declares Quarter 2 results)चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जुलै ते सप्टेंबर 2021 या तीन महिन्यांत (Tremendous growth in the performance) कंपनीच्या कामगिरीत गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. कंपनीनं या तिमाहीत 15 हजार 479 कोटींचा (RIL earns 15,479 Cr profit) नफा कमावला असून तो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 46 टक्के अधिक असल्याचं दिसून आलं आहे. गेल्या वर्षीपेक्षा सरस कामगिरी रिलायन्स इंडिया लिमिटेडची सर्वच आघाड्यांवरील कामगिरी गेल्या वर्षीच्या तुलनेत सरस ठरली आहे. कोरोनाची दुसरी लाट आणि लॉकडाऊन यामुळे गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीनं 10 हजार 602 कोटी रुपयांचा नफा कमावला होता, तर या तिमाहीत कंपनीनं कमावलेला नफा आहे 13 हजार 806 कोटी रुपये. म्हणजेच निव्वळ नफ्याचा विचार केला तर यंदा 12.1 टक्के अधिक नफा कंपनीनं कमावल्याचं स्पष्ट झालं आहे. एकत्रित महसूलातही वाढ कंपनीनं जून 2021 च्या तिमाहीत 1.74 लाख कोटींच्या एकत्रित महसूलाची नोंद केली आहे. कोरोना काळातील गेल्या वर्षीच्या महसुलाचा आकडा होता 1.16 लाख कोटी. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीनं यंदा 20.6 टक्के एकत्रित महसुलात वाढ नोंदवली आहे. रिलायन्सची ही कामगिरी म्हणजे देशातील उद्योग क्षेत्रानं कोरोनावर मात केल्याचं प्रतीक असल्याची प्रतिक्रिया चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी दिली आहे. रिटेल आणि ऑईल-टू-केमिकल या दोन क्षेत्रांमध्ये सर्व उद्योजकांनी उत्तम कामगिरी केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला परफॉर्मन्स केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एका उद्योजक समूह म्हणून आणि देश म्हणूनही आपण कोरोनावर मात केल्याचं यातून दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया मुकेश अंबानी यांनी दिली आहे. हे वाचा- काय चाललंय काय? शाळेत विद्यार्थ्याने आणला देशी कट्टा, VIDEO बनवून केला व्हायरल कंपनीने रचला इतिहास रिलायन्स इंडिया ही 18 हजार कोटींचं मार्केट कॅपिटल असणारी भारतातील पहिली लिस्टेट कंपनी ठरली आहे. नुकताच कंपनीच्या नावावर या विक्रमाची नोंद झालीआहे. 19 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या शेअरनं 2750 रुपये या सर्वोच्च ऐतिहासिक भावाची नोंद केली होती.
  Published by:desk news
  First published: