मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Digital Gold : दिवाळीत अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं! कसं? वाचा सविस्तर

Digital Gold : दिवाळीत अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं! कसं? वाचा सविस्तर

दिवाळीनिमित्त सोनं (Buy Gold) खरेदीचा विचार असेल तर डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय (How To buy Gold online) असू शकतो.

दिवाळीनिमित्त सोनं (Buy Gold) खरेदीचा विचार असेल तर डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय (How To buy Gold online) असू शकतो.

दिवाळीनिमित्त सोनं (Buy Gold) खरेदीचा विचार असेल तर डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय (How To buy Gold online) असू शकतो.

    मुंबई, 22 ऑक्टोबर : भारतीयांना धनत्रयोदशी किंवा दिवाळीनिमित्त (Diwali Feastival) सोने खरेदी करायला आवडते. या दिवशी सोने खरेदी (Gold Investment) करणे शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय (How To buy Gold online) असू शकतो. तुम्ही Google Pay, Paytm, PhonePe सारख्या अनेक मोबाईल वॉलेट प्लॅटफॉर्मवर 1 रुपयात सोने खरेदी करू शकता. डिजिटल सोन्याची खरेदी प्रत्यक्षात सोनं खरेदी करण्यापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. प्रत्यक्ष सोनं खरेदी करताना तुम्ही ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याचे दागिने खरेदी करता आणि त्यांचा वापर करता, पण इथे तसे नाही. आपण येथे डिजिटल सोन्याला स्पर्श करू शकत नाही. सोन्याची शुद्धता किंवा सुरक्षेची चिंता नाही कारण इथे सोने शुद्ध असते. गेल्या काही वर्षांत डिजिटल सोने गुंतवणुकीचे प्रमुख माध्यम म्हणून उदयास आले आहे. Gold Investment: अवघ्या 500 रुपयांत करा सोन्यामध्ये गुंतवणूक, SIP द्वारे खरेदी करा सोनं तुम्ही तुमच्या फोनवरून सोने खरेदी करू शकता Google Pay प्लॅटफॉर्मवर खरेदी करण्यासाठी, तुम्हाला लॉगिन केल्यानंतर खाली स्क्रोल करावे लागेल आणि गोल्ड आयकॉनवर क्लिक करावे लागेल. यानंतर, मॅनेज युवर मनीमध्ये Gold Buy चा पर्याय निवडावा लागेल. येथे तुम्ही एक रुपयामध्ये सुद्धा डिजिटल सोने खरेदी करता येणार आहे. तसेच 3 टक्के जीएसटी भरावा लागेल. जर तुम्ही या प्लॅटफॉर्मवर 5 रुपयांचे डिजिटल सोने खरेदी केले तर तुम्हाला 0.9 mg मिळेल. खरेदी व्यतिरिक्त सोन्याची विक्री, डिलिव्हरी आणि गिफ्ट यांचाही पर्याय मिळेल. तुम्हाला सोने विकायचे असल्यास सेल बटणावर क्लिक करावे लागेल. गिफ्टसाठी गिफ्टचा पर्याय निवडावा लागतो. गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी सेबीचं फर्मान, Gold Investment बाबत जारी केले नवे नियम तुम्ही पेटीएमवरही सोने खरेदी करू शकता तुम्ही तुमच्या पेटीएमच्या ऑप्शनमध्ये जा आणि PaytmGold च्या पर्यायावर क्लिक करा. PhonePe वरून सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला Mymoney वर क्लिक करावे लागेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Diwali 2021, Gold, Online payments

    पुढील बातम्या