नवी दिल्ली, 24 डिसेंबर: जर तुम्ही स्वस्तात घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करू इच्छित आहात तर पंजाब नॅशनल बँक (PNB) तुम्हाला एक चांगली संधी देत आहे. पंजाब नॅशनल बँक काही मालमत्तांचा ई-लिलाव (E-Auction) करणार आहे. यामध्ये निवासी आणि व्यावसायिक (Residential and Commercial) दोन्ही प्रकारच्या मालमत्तांचा समावेश आहे. अशावेळी तुम्ही देखील घर खरेदी करण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. डिफॉल्टमध्ये आलेल्या विविध मालमत्तांचा लिलाव बँकांकडून करण्यात येतो, त्याप्रकारच्या या मालमत्ता आहेत. IBAPI (Indian Banks Auctions Mortgaged Properties Information) ने याबाबत माहिती दिली आहे.
डिफॉल्ट प्रॉपर्टीचा होतो लिलाव
एखाद्या प्रॉपर्टीसाठी घेण्यात आलेलं कर्ज फेडलं नाही किंवा कोणत्याही कारणामुळे तर ती रक्कम बँकेला दिली नाही तर त्या सर्व लोकांची जमीन बँकेद्वारे ताब्यात घेतली जाते. पंजाब नॅशनल बँक देखील अशा प्रॉपर्टीचा लिलाव करणार आहे. या लिलावातून बँक ती प्रॉपर्टी विकून संपूर्ण रक्कम वसूल करते.
(हे वाचा-ITDC, BEML सह अर्धा डझन कंपन्यांची भागीदारी विकण्याच्या तयारीत मोदी सरकार)
पीएनबीने त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून याबाबात माहिती दिली आहे. पीएनबीने दिलेल्या माहितीनुसार 29 डिसेंबर 2020 रोजी रेसिडेन्शिअल आणि कमर्शिअल मालमत्तांचा ई-लिलाव होणार आहे.
Get reasonable prices for property with PNB e-auction of residential & commercial property being held on December 29, 2020.
To know more, visit e-Bikray Portal : https://t.co/N1l10s1hyq pic.twitter.com/HEga6O97A2
— Punjab National Bank (@pnbindia) December 24, 2020
किती आहे प्रॉपर्टी?
यामध्ये 3681 निवासी, 961 व्यावसायिक, 527 इंडस्ट्रियल तर 7 कृषी संबंधित प्रॉपर्टींचा समावेश आहे. या सर्व मालमत्तांचा लिलाव बँकेकडून करण्यात येणार आहे. अधिक माहितीकरता तुम्ही https://ibapi.in/ या वेबसाइटवर जाऊन माहिती मिळवू शकता.
(हे वाचा-PM-KISAN: उद्या येणार 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये, तपासा तुमचं नाव)
बँक मालमत्ता फ्रीहोल्ड किंवा लीजहोल्ड झाल्यानंतर स्थान आणि किती जागा आहे अशी माहिती असणारी सार्वजनिक नोटीस जारी करते. जर ई-लिलावच्या माध्यमातून तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करणार असाल तर बँकेमध्ये जाऊन प्रक्रिया आणि संबंधित प्रॉपर्टीबाबत माहिती घेऊ शकता. ही लिलावाची प्रक्रिया 29 डिसेंबर रोजी होणार आहे.