लक्ष्मण रॉय (सीएनबीसी आवाज), नवी दिल्ली, 24 डिसेंबर: आर्थिक वर्ष संपण्याच्या जवळ पोहोचू लागले आहे, तसतसे सरकारी कंपन्यांमधील निर्गुंतवणुकीची प्रक्रिया देखील वेगाने होऊ लागली आहे. सीएनबीसी आवाज (CNBC Awaaz) ला मिळालेल्या एक्सक्लूझिव्ह माहितीनुसार SCI आणि Air India नंतर आता ITDC, BEML सह अर्धा डझन कंपन्यांची भागीदारी विकण्याच्या तयारीत सरकार आहे. याकरता पुढील आठवड्यात सरकारची एक महत्त्वाची बैठक देखील होणार आहे.
BEML मधील 26% भागीदारी विकण्यासाठी 28 डिसेंबर रोजी होणार बैठक
अहवालानुसार, येणाऱ्या काळात सरकार निर्गुंतवणुकीबाबत वेगाने पुढे जाऊ इच्छित आहे. याकरता महत्त्वाची बैठक देखील होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पुढील आठवड्यात 28 डिसेंबर रोजी BEML मधील 26% भागीदारी विकण्यासंदर्भात कोअर ग्रुप ऑफ सेक्रेटरीज ऑन डिसइनव्हेस्टमेंट (CCD) यांच्या समवेत बैठक होईल. या बैठकीत संबंधित मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
#AwaazExclusive। सरकार ने तेज की विनिवेश की रफ्तार ।SCI और Air India के बाद अब BEML, ITDC समेत आधा दर्जन कंपनियों के लिए अगले हफ्ते अहम बैठक होने वाली है। एक्सक्लूसिव डिटेल्स जानिए @RoyLakshman से ।#MorningCall #AwaazMarkets @AshVerma111 pic.twitter.com/PouRJ2DfVf
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) December 24, 2020
CCD च्या या बैठकीत BEML ची भागीदारी विकण्याबाबत पीआयएम (Preliminary Information Memorandum) आणि एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI Expression of Interest) च्या ड्राफ्टला अंतिम मंजुरी मिळू शकते. सध्या BEML मध्ये सरकारची 54.03 टक्के भागीदारी आहे.
(हे वाचा-EDचा कृषी कर्ज घोटाळ्यात रासप आमदाराला झटका, 'गंगाखेड'ची 255 कोटी मालमत्ता जप्त)
पुढील बैठक 30 डिसेंबर रोजी
दरम्यान दुसरी महत्त्वाची बैठक 30 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. आयटीडीसी (ITDC) चं हॉटेल अशोका विकण्याबाबत किंवा लीजवर देण्यासाठी ही बैठक होईल. या बैठकीमध्ये स्ट्रॅटेजिक सेलवर निर्णय होई शकतो. ही बैठक आयएमजी (Inter Ministerial Group) ची असेल, ज्यामध्ये स्ट्रॅटेजिक सेलच्या विविध प्रस्तावांवर विचार केला जाईल तसंच त्यांना अंतिम स्वरुप दिलं जाईल. अशाचप्रकारे एकूण अर्धा डझन कंपन्यांसाठी बैठक होणार आहे.