जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PMC Bank Update:पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवरील निर्बंध 31 डिसेंबर 2021 पर्यंत कायम

PMC Bank Update:पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवरील निर्बंध 31 डिसेंबर 2021 पर्यंत कायम

PMC Bank Update:पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवरील निर्बंध 31 डिसेंबर 2021 पर्यंत कायम

PMC Bank: पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात PMC Bank वर असलेल्या निर्बंधासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेनं महत्त्वाची माहिती दिली आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

नवी दिल्ली, 26 जून : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात PMC Bank वर असलेले निर्बंध भारतीय रिझर्व्ह बँकेने आणखी सहा महिन्यांनी वाढवले आहेत. PMC बँकेवरील निर्बंध 31 डिसेंबर 2021पर्यंत कायम राहणार आहेत, अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे RBI ने शुक्रवारी (25 जून) जाहीर केली. ‘आज तक’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. पीएमसी बँकेने दिलेल्या एकूण 8383 कोटी रुपयांच्या कर्जांपैकी 70 टक्के कर्ज HDIL या एकाच कंपनीला देण्यात आल्याचं उघड झालं होतं. तसंच, बँकेच्या व्यवहारात आणखी काही घोटाळे असल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर सप्टेंबर 2019मध्ये या बँकेवर पहिल्यांदा निर्बंध लागू करण्यात आले होते. सुरुवातीला बँकेच्या ग्राहकांना केवळ एक हजार रुपयेच काढण्याची अनुमती देण्यात आली होती. त्यानंतर ही मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती. बँकेचे निर्बंध आतापर्यंत अनेकदा वाढवण्यात आले असून, त्याच्या नियमांत बदलही करण्यात आले आहेत. PMC बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेसला (Centrum Financial Services) या बँकेचं अधिग्रहण करून तिचं स्मॉल फायनान्स बँकेत (Small Finance Bank) रूपांतर करण्याच्या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली होती. पीएमसी बँकेच्या अधिग्रहणासाठी इच्छूक असलेल्यांकडून अर्ज मागवण्याबद्दलची अधिसूचना (Expression of Interest) रिझर्व्ह बँकेने तीन नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केली होती. सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेसने एक फेब्रुवारी 2021 रोजी आपला प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे सादर केला. हा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यातच तत्त्वतः मंजूर केला होता. या प्रस्तावानुसार आता सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेसकडून पीएमसी बँकेचं अधिग्रहण (Take Over) केलं जाणार आहे. अधिग्रहण आणि स्मॉल फायनान्स बँकेत तिचं रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला काही कालावधी लागणार आहे. म्हणूनच अधिग्रहणाची प्रक्रिया सुरळीत पार पाडली जावी, या हेतूने पीएमसी बँकेवरचे निर्बंध 31 डिसेंबर 2021पर्यंत वाढवण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. हेही वाचा-  ईडीच्या रडारवर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का खासगी क्षेत्रातल्या स्मॉल फायनान्स बँकेसाठी पाच डिसेंबर 2019 रोजी सर्वसाधारण ऑन-टॅप गाइडलाइन्स प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यानुसार सेंट्रल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असल्याचं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं. अधिग्रहणाच्या या प्रस्तावानुसार रिझर्व्ह बँकेने Bharat Pe च्या सहकार्याने स्मॉल फायनान्स बँकेची निर्मिती करण्यास सेंट्रम ग्रुपला परवानगी दिली आहे. या प्रस्तावानुसार गुंतवणूकदारांना बँकेला 9 टक्के रिस्क वेटेड अॅसेट्स रेशोपर्यंत (CRAR) पोहोचवण्यासाठी आवश्यक निधीची पूर्तता करावी लागेल, असं मनीकंट्रोल डॉट कॉमच्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या वर्षी मार्च अखेरीपर्यंत PMC बँकेकडे 10,727 कोटी रुपयांच्या ठेवी आणि 4472.78 कोटी रुपयांचे अॅडव्हान्सेस होते. बँकेचा ग्रॉस NPA 3518.89 कोटी रुपये होता. बँकेचं शेअर कॅपिटल 292.94 कोटी रुपये होतं. तसंच, बँकेने 6835 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचं नमूद केलं होतं. हेही वाचा-  आरोग्यमंत्र्यांचं महिला सहकाऱ्यासोबत अफेअर? ऑफिसबाहेरच KISS करताना CCTV मध्ये कैद PMC बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी साधारण दोन वर्षांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने या बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं. तसंच, बँकेचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर जॉय थॉमस यांच्यासह अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात