Home /News /videsh /

आरोग्यमंत्र्यांचं महिला सहकाऱ्यासोबत अफेअर? ऑफिसबाहेरच KISS करताना CCTV मध्ये कैद

आरोग्यमंत्र्यांचं महिला सहकाऱ्यासोबत अफेअर? ऑफिसबाहेरच KISS करताना CCTV मध्ये कैद

ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक (Matt Hancock) यांचं निकटवर्तीय असलेल्या जिना कोलाडांगेलो (Gina Coladangelo) यांच्याशी सिक्रेट अफेअर आहे. दोघंही किस करताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

    लंडन 26 जून : ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक (Matt Hancock) यांचं निकटवर्तीय असलेल्या जिना कोलाडांगेलो (Gina Coladangelo) यांच्याशी सिक्रेट अफेअर (Matt Hancock’s secret affair) आहे. जिना यांना त्यांनी मागील वर्षीच करदात्यांच्या पैशातून नोकरी दिली होती. ‘द सन’ या ब्रिटिश वृत्तपत्राने याचा खुलासा केला आहे. द सनच्या रिपोर्टनुसार, 42 वर्षीय आरोग्य सचिव मॅट हॅन्कॉक जिना कोलाडांगेलोला किस करताना कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. लंडनमधील आरोग्य विभागाच्या मुख्यालयात त्यांच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मॅट हॅन्कॉक (Matt Hancock) आपल्या ऑफिसच्या बाहेर एका महिलेला किस करताना दिसले आहेत आणि हे छायाचित्र गेल्या महिन्याच्या 6 तारखेचं असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, एका व्हिस्लब्लोअरने सांगितले, की ते दोघं नियमितपणे एकत्र दिसतात. एका सूत्रानं असं म्हटलं आहे, की करदात्यांच्या पैशानं कामावर घेतलेल्या सहकाऱ्यासोबत कोरोना महामारीच्या काळात आरोग्य मंत्री मॅट हॅन्कॉक यांचे प्रेमसंबंध आहेत हे धक्कादायक आहे. लिंकद्वारे ऑनलाइन क्लासमध्ये घुसून मुलीला अश्लील भाषेत शिवीगाळ; भाईंदरमधील घटना हॅन्कॉक यांनी 15 वर्षापूर्वी मार्था होयर मिलर (Martha Hoyer Millar) यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती आणि त्यांनी तीन मुलं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हॅन्कॉक याचं ज्या महिलेसोबत अफेअर सुरू आहे तिचं नाव जिना कोलाडांगेलो (Gina Coladangelo) असं आहे. 43 वर्षीय जीना ऑलिव्हर बोनास या फॅशन आणि लाईफस्टाईल स्टोअरमध्ये संप्रेषणांच्या संचालक आहेत. त्या लॉबींग फर्म ल्यूथर पेंड्रागनमध्ये एक दिग्दर्शक आणि प्रमुख भागधारकदेखील आहे. हॅन्कोकने गेल्या वर्षी या महिलेला छुप्या पद्धतीने करारावर सल्लागार म्हणून स्वतःच्या विभागात नियुक्त केलं होतं. अखेर CCTV टेक्निशियनचं बिंग फुटलं; Private Video रेकॉर्ड करून करायचा ब्लॅकमेल जिनादेखील विवाहित आहेत आणि त्यांना तीन मुलं आहेत. जिनाचे पती ओलिवर ट्रेस (Oliver Tress) हे फॅशन आणि लाईफस्टाईल स्टोर ओलिवर बोनासचे मालक आहेत. हॅन्कॉक यांच्या कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी अपयशी ठरल्याचे आरोप अनेकदा होत असतात. तसंच या काळात पैशांचाही मोठा घोळ झाल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Britain, Viral news, Women extramarital affair

    पुढील बातम्या