Coronavirus नंतरच्या आर्थिक संकटात रिलायन्सने घेतले मोठे निर्णय; मुकेश अंबानींनी सोडलं संपूर्ण वेतन

Coronavirus नंतरच्या आर्थिक संकटात रिलायन्सने घेतले मोठे निर्णय; मुकेश अंबानींनी सोडलं संपूर्ण वेतन

1 एप्रिलपासून स्वतः रिलायन्सचे चेअरमन मुकेस अंबानी यांनी त्यांचं वेतन किंवा कामाचा मोबदला न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : Coronavirus च्या साथीपाठोपाठ देशभरात आर्थिक संकट येऊ घातलं आहे. देशव्यापी लॉकडाऊन आणि थांबलेलं जग यामुळे अनेत उद्योगांचं मोठं नुकसान होत आहेत. त्यामुळे आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी काही उद्योगांना वेतनकपात, नोकरकपात यासारखे कटू निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यातच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलपासून स्वतः रिलायन्सचे चेअरमन मुकेस अंबानी यांनी त्यांचं वेतन किंवा कामाचा मोबदला न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

रिलायन्सच्या वतीने कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटलं आहे की, 'या संकटकाळात कर्मचाऱ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आरोग्य आणि सुरक्षा हा आमचा प्राधान्यक्रमाचा विषय आहे. त्यासाठी 24 तास इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम सुरू केली आहे. कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.'

'पेट्रोकेमिकल्स आणि शुद्धीकरण उत्पादनांना सध्याच्या परिस्थितीत फार मागणी नाही. त्यामुळे हायड्रोकार्बन्सचा उद्योग संकटात आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कठोर नियोजन आवश्यक आहे आणि यात आपल्या सगळ्यांचा सहभाग हवा आहे. थोडी बचत आणि कॉस्ट कटिंगचे निर्णय हे त्यासाठी घेण्यात आले आहेत. ते 1 एप्रिलपासून लागू झालेले आहेत. '

परदेशात अडकलेले भारतीय परत येणार, मोदी सरकारने तयार केला आराखडा

रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी लिहिलेल्या पत्रात 1 एप्रिलपासून कॉस्ट कटिंगसाठी काही उपाय योजल्याची माहिती दिली आहे. त्यामध्ये वार्षिक 15 लाखांहून कमी वेतन असलेल्यांच्या पगाराला हात लावणार नाही, असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं आहे. 15 लाखांहून अधिक वेतन असणाऱ्यांच्या पगारात 10 टक्क्यांनी कपात करण्यात येणार आहे.

पवारांच्या बारामतीत चाललंय तरी काय, ऐतिहासिक वास्तू रातोरात केली जमीनदोस्त

First published: April 30, 2020, 6:29 PM IST

ताज्या बातम्या