जाहिरात
मराठी बातम्या / मनी / हातात पैसे ठेवायची गरज नाही! RBI कडून Digital Rupee ची सुरुवात

हातात पैसे ठेवायची गरज नाही! RBI कडून Digital Rupee ची सुरुवात

हातात पैसे ठेवायची गरज नाही! RBI कडून Digital Rupee ची सुरुवात

भारताची डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल, पेमेंट सिस्टिम अधिक सक्षम होईल आणि मनी लॉन्ड्रिंगला आळा बसेल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आजपासून सुरू करणार डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्ट, 9 बँकांची करण्यात निवड करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केले होते की ते लवकरच डिजिटल रुपयाचे पायलट लाँचिंग सुरू करणार आहेत. आता १ नोव्हेंबरपासून त्याची सुरुवात होणार आहे. आता आरबीआयचे स्वतःचे डिजिटल चलन प्रत्यक्षात येणार आहे. रिझर्व्ह बँक (आरबीआय) १ नोव्हेंबरपासून व्यवहारांसाठी डिजिटल फॉर्म लाँच केलं आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर हे सुरू करण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते, यामुळे भारताची डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल, पेमेंट सिस्टिम अधिक सक्षम होईल आणि मनी लॉन्ड्रिंगला आळा बसेल. डिजिटल फॉर्मचा वापर सरकारी सिक्युरिटीजच्या सेटलमेंटसाठी केला जाईल. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी 9 बँका निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), बँक ऑफ बडोदा (बीओबी), युनियन बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसी बँक यांचा समावेश असेल.

महागाईचा पुन्हा बॉम्ब फुटणार? RBI पुन्हा वाढवणार व्याजदर?

देशात आरबीआयचे डिजिटल चलन (ई-रुपी) लागू झाल्यानंतर तुम्हाला रोख रक्कम तुमच्याकडे ठेवण्याची गरज भासणार नाही. ते आपल्या मोबाइल वॉलेटमध्ये ठेवू शकता आणि या डिजिटल चलनावर RBI चं लक्ष देखील असणार आहे. रिटेल ई रुपया हा सर्वांसाठी असणार आहे. यामध्ये कोणीही गुंतवणूक करू शकतं किंवा ते पैसे घेऊन वापरू शकतं. होलसेल ई रुपयासाठी मात्र काही अटी आणि नियम असणार आहेत. निवडक वित्तीय संस्थांसाठी होलसेल ई-रुपी उपलब्ध असेल. ई-रुपी डायरेक्ट मॉडेल आणि अप्रत्यक्ष मॉडेलमध्ये असेल. थेट मॉडेल ई रुपया थेट रिझर्व्ह बँकेद्वारे जारी केला जाईल. बँक अप्रत्यक्ष मॉडेलसह ई-रुपीमध्ये देखील सहभागी होईल. ई-रुपया टोकन स्वरूपात असेल. केप्टोकरन्सी किंवा बिटकॉईनला स्पर्धा करणारं हे ई रुपया असणार आहे. हिशेबासाठी ई-रुपी देखील वेगळा असेल.

2 मोठ्या बँकांनी दिवाळीआधी ग्राहकांना दिली आनंदाची बातमी
News18लोकमत
News18लोकमत

लोकांना आपल्याजवळ पैसे ठेवण्याची गरज यामुळे पडणार नाही. हे मोबाईल वॉलेट किंवा ऑनलाइन पेमेंटसारखं काम करेल अशी माहिती दिली आहे. डिजिटल करन्सीला तुम्ही तुमच्या फोनमधील पेमेंट App वरही ठेवू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात