जाहिरात
मराठी बातम्या / मनी / महागाईचा पुन्हा बॉम्ब फुटणार? RBI पुन्हा वाढवणार व्याजदर?

महागाईचा पुन्हा बॉम्ब फुटणार? RBI पुन्हा वाढवणार व्याजदर?

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया Jobs

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया Jobs

RBI च्या अध्यक्षांनी 3 नोव्हेंबर रोजी महत्त्वाची बैठक बोलवली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई: जगभरात मंदीचे संकेत अधिक तीव्र होत आहेत. महागाईवर नियंत्रण मिळवणं कठीण झालं आहे. अशा परिस्थितीमध्ये आता महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुन्हा एकदा RBI आपल्या रेपो रेटमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. रेपो रेटमध्ये वाढ करण्याबाबत RBI च्या अध्यक्षांनी 3 नोव्हेंबर रोजी महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीत होणाऱ्या निर्णयांचा डायरेक्ट परिणाम तुमच्या आमच्यावर येणार आहे. मॉनिटरी पॉलिसी कमिटीची ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ही समिती क्रेडिट पॉलिसीची समीक्षा करतात. त्यामुळे पुन्हा एकदा रेपो रेटच्या दरात आता वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता EMI आणि लोन महागणार का? याचं टेन्शन सर्वसामान्य जनतेला आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार 3 नोव्हेंबर रोजी मॉनिटरी पॉलिसीबाबत बैठक होणार आहे. महागाईवर नियंत्रण कसं मिळवायचं आणि अजून कोणत्या गोष्टी करता येऊ शकतात याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.

RBI ची पुन्हा एकदा 2 सहकारी बँकांवर कारवाई, तुमची बँक तर नाही?

३० सप्टेंबर रोजी RBI ने 0.50 टक्के व्याजदरात वाढ केली. त्यामुळे बँकांचं कर्ज आणि EMI मध्ये वाढ झाली आहे. RBI ने सप्टेंबर महिन्यात सलग चौथ्यांचा रेपो रेट वाढवला. सप्टेंबर अखेरपर्यंत व्याजदर 0.50 टक्क्यांनी वाढून 5.90 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

News18लोकमत
News18लोकमत
Digital Currency च्या दिशेन RBI ची वाटचाल, तुम्हाला घेता येणार की नाही वाचा सविस्तर

या वर्षात मध्यवर्ती बँकेने व्याजदरात केलेली ही चौथी वाढ होती. याआधी ऑगस्टमध्ये रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली होती आणि व्याजदर 4.90 टक्क्यांवरून 5.40 टक्के करण्यात आलं होतं. आता पुन्हा नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात व्याजदरात वाढ होणार का याची धाकधूक लागली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात