जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / 2 मोठ्या बँकांनी दिवाळीआधी ग्राहकांना दिली आनंदाची बातमी

2 मोठ्या बँकांनी दिवाळीआधी ग्राहकांना दिली आनंदाची बातमी

2 मोठ्या बँकांनी दिवाळीआधी ग्राहकांना दिली आनंदाची बातमी

2 मोठ्या बँकांनी दिवाळीआधी घेतला ग्राहकांसाठी मोठा निर्णय, तुमचं खातं आहे का?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : दिवाळी जवळ आली आहे अगदी मोजून काही दिवस उरले आहेत. यंदाच्या दिवाळीवर महागाईचं संकट आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा जरा जास्तच रिकामा होत आहे. आधीच बँकांनी व्याजदरात वाढ केल्यानं कर्ज आणि EMI महाग झालं आहे. दिवाळीपूर्वी दोन बँकांनी मात्र ग्राहकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. तुमचं या बँकेत खातं असेल तर तुमच्यावर त्याचा कसा परिणाम होणार जाणून घेऊया. देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या ICICI बँकेने फिक्स डिपॉझिटच्या दरात बदल केला. देशातील सर्वात मोठी बँक असलेली कोटक महिंद्रा बँकेनंही आपल्या फिक्स डिपॉझिटच्या दरात बदल केले आहेत. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील ठरावीक मुदतीसाठी व्याजदरात वाढ केल्याची माहिती मिळाली आहे. बँक ग्राहकांना एफडीवर जास्त व्याज मिळणार आहे. हे नवे दर 18 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. बँकेने 30 सप्टेंबर रोजी ‘गोल्डन इयर्स एफडी’ योजनाही सुरू केली आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.

राकेश झुनझुनवालांनी गुंतवूणक केलेला हा शेअर झाला ‘रॉकेट’, अजूनही संधी

आयसीआयसीआय बँकेत एफडीवर 3.00% ते 6.10% पर्यंत व्याज मिळेल. आयसीआयसीआय बँकेतील एफीसाठी सर्वाधिक व्याजदर 3 वर्षे, 1 दिवस ते 5 वर्षांपर्यंतच्या मॅच्युरिटीसाठी 6.20 टक्के असेल असं सांगण्यात आलं आहे.

ICICI बँक- वर्ष- कालावधीव्याजदर किती टक्के मिळणार
7 ते 29 दिवसांपर्यंत3.50%
30 ते 60 दिवसांपर्यंत3.50%
60 ते 90 दिवसांपर्यंत3.75%
91 ते 184 दिवसांपर्यंत4.25%
185 ते 365 दिवसांपर्यंत5%
1 वर्षापासून 2 वर्षांपर्यंत5.80%
2 वर्षापासून 3 वर्षांपर्यंत6%
3 वर्षापासून 5 वर्षांपर्यंत6.20%
5 वर्षापासून 10 वर्षांपर्यंत6.10%
News18लोकमत
News18लोकमत

कोटक महिंद्रा बँक 7 दिवस ते 14 दिवसांच्या एफडीवर 2.50% व्याज मिळेल 15 ते 30 दिवसांच्या एफडीवर बँक आता 10 बेसिस पॉईंट्स 2.75% जास्त व्याज देणार 31 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 3.25% व्याज देणार बँका 91 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर 3.75 टक्के व्याज मिळेल

Money Mantra : नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा; आजचं आर्थिक राशिभविष्य जरूर वाचा

121 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर 4 टक्के व्याज मिळेल 23 महिन्यांच्या एफडीवर 6.2% व्याज देणार 3 वर्ष ते 10 वर्षांच्या एफडीवर 6.10% व्याज मिळेल कोटक महिंद्रा बँक सर्वसाधारण नागरिकांना वार्षिक 2.50% ते 6.20% आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.00% ते 6.70% व्याज देते. 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी ग्राहकांना FD ठेवता येते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात