• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • शेअर बाजारात गुंतवणूक करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नुकसान कमी होईल

शेअर बाजारात गुंतवणूक करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नुकसान कमी होईल

जर तुम्ही एखाद्या कंपनीत गुंतवणूक केली तर ती कंपनी नफा कमावते आहे की नाही यावर लक्ष ठेवलं पाहिजे. जर एखादी कंपनी नफा कमावत असेल तर ती नक्कीच आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करेल.

 • Share this:
  मुंबई, 7 नोव्हेंबर : शेअर बाजार (Share Market) सध्या तेजीत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर बाजारात नव्या गुंतवणूकदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. छोट्या गुंतवणूकदारांनी कमी गुंतवणूक (Investors) केली असेल, पण त्यांची संख्या खूप जास्त आहे. इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, 2016 मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचे (Retail Investors) योगदान 33 टक्के होते, जे 2021 मध्ये वाढून 45 टक्के झाले. त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुंतवणूक करताना काही गोष्टींचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे, जेणेकरुन नुकसान होणार नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. नफा कमावणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करा तज्ज्ञांचा सल्ला असतो की जर तुम्ही एखाद्या कंपनीत गुंतवणूक केली तर ती कंपनी नफा कमावते आहे की नाही यावर लक्ष ठेवलं पाहिजे. जर एखादी कंपनी नफा कमावत असेल तर ती नक्कीच आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करेल. याशिवाय, जर तुम्हाला बाजारातून पैसे कमवायचे असतील, संपत्ती निर्माण करायची असेल तर तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागेल. 25 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या 3 स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल, या शेअरने तर दिला 14850% चा रिटर्न कोणत्याही क्षेत्रातील लीडर स्टॉक निवडा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वत:साठी व्हॅल्यू स्टॉक निवडणे महत्त्वाचे आहे. जर एखाद्या शेअरचा प्राईज अर्निंग रेश्यो (price earnings ratio) जास्त असेल तर त्यापासून अधिक कमाईची अपेक्षा करणे अयोग्य ठरेल. अशा परिस्थितीत असं सेक्टर निवडा ज्याचे भविष्य उज्ज्वल असणार आहे आणि मग त्यातील लीडर कंपन्या शोधा. आघाडीच्या कंपन्या एखाद्या क्षेत्राला पुढे नेण्याचे काम करतात. उदाहरणार्थ, यावर्षी मेटल, आयटी आणि रिअल इस्टेट कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे. 2020 पूर्वी या क्षेत्रांमध्ये गुंतवणूकदारांची आवड कमी होती. Business Idea: केवळ 25000 रुपयांत सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल लाखोंची कमाई सेंट्रल बँकांच्या पैशाने बाजारात तेजी तिसरी महत्त्वाची गोष्ट जाणून घेण्यापूर्वी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, जगाच्या मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणावर नोटा छापल्यापासून बुल मार्केटची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोरोनामुळे लाखो नोकऱ्या गेल्या. अशा परिस्थितीत पर्यायी उत्पन्नासाठी घरी बसलेल्या लोकांचे डोळे शेअर बाजाराकडे गेले. आता ही तेजी पुढील 2-3 वर्षे सुरूच राहणार असल्याचे सध्या तरी स्पष्ट दिसत आहे. मात्र तरीही तुमचा पोर्टफोलिओ वेळोवेळी अपडेट करत राहा.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: