Reliance Retail-Kishore Biyani deal: भागधारकांसाठी असा फायद्याचा ठरणार हा करार

Reliance Retail-Kishore Biyani deal: भागधारकांसाठी असा फायद्याचा ठरणार हा करार

रिलायन्स समुहाची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स (RRVL) ने किशोर बियानी प्रमोटेड फ्यूचर ग्रुप (Future Group)च्या रिटेल, होलसेल व्यवसाय, लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस व्यवसाय संपादन करण्याची घोषणा केली आहे.

  • Share this:

मुंबई, 30 ऑगस्ट : रिलायन्स समुहाची (Reliance Industries) उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स (RRVL) ने किशोर बियानी प्रमोटेड फ्यूचर ग्रुप (Future Group)च्या रिटेल, होलसेल व्यवसाय, लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस व्यवसायाचे संपादन करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स रिटेल आणि फ्यूचर ग्रृपमध्ये हा करार 24,713 कोटींमध्ये होत आहे. स्लंप सेलच्या आधारावर हा करार होत आहे.  दोन्ही कंपन्यांमध्ये हा करार एका विशेष योजनेअंतर्गत झाला आहे, ज्यामध्ये फ्यूचर ग्रृप भविष्यात बिझनेस करणाऱ्या काही कंपन्यांचे फ्यूचर एंटरप्राइज लिमिटेड (FEL)मध्ये विलय करत आहे. या योजनेअंतर्गत रिटेल आणि होलसेल उपक्रमांना रिलायन्स रिटेल अँड फॅशन लाइफस्टाइल लिमिटेड (RRFLL) ला हस्तांतरित केले जात आहे.

या योजनेअंतर्गत-

-रिटेल आणि होलसेल उपक्रमांना रिलायन्स रिटेल अँड फॅशन लाइफस्टाइल लिमिटेड (RRFLL) ला हस्तांतरित केले जात आहे. या कंपनीचा मालकी हक्क RRVL कडे आहे.

(हे वाचा-सॅनिटाइझ करून उन्हामध्ये वाळवल्यामुळे 2000 च्या 17 कोटी नोटा झाल्या खराब)

-लॉजिस्टिक आणि वेअरहाऊसिंग उपक्रमांना RRVL कडे हस्तांतरित केले जाणार आहे.

-RRFLLने देखील गुंतवणूकीचा प्रस्ताव आणला आहे, जो पुढीलप्रमाणे आहे. विलीनीकरणानंतर, एफईएलमध्ये 6.09 टक्के इक्विटी शेअर्ससाठी प्राधान्य इश्यूच्या माध्यमातून 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. इक्विटी वॉरंटद्वारे प्राधान्य इश्युसाठी 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल.  75% रकमेचे कनव्हर्जन आणि पेमेंट केल्यानंतर आरआरएफएलएलचे संपादन पूर्ण होईल.

फ्यूचर ग्रूप रिलायन्समध्ये आल्यानंतर आता RIL देशातला सर्वांत मोठा रिटेल उद्योग ठरू शकतो. या नव्या करारामुळे देशभरातली 1800 फ्यूचर रिटेल स्टोअर्स रिलायन्सला मिळणार आहेत. सध्या रियायन्सची अमेझॉनशी सुरू असलेली ई कॉमर्सची स्पर्धा यामुळे आणखी तगडी होईल. रिलायन्सला या मोठ्या रिटेल डीलमुळे मोठा ग्राहकवर्ग मिळू शकतो. रिलायन्स आणि फ्यूचर ग्रूप दरम्यान झालेल्या कराराप्रमाणे,  बिग बझार, फूड हॉल, निलगिरीज, FBB, Cetral, ब्रँड फॅक्टरी, हेरिटेज फूड हे सगळे रिटेल ब्रँड रिलायन्सकडे येतील.

फ्यूचर ग्रृपमधील विविध कंपन्यांच्या भागधारकांसाठी हा करार कसा फायद्याचा?

-फ्यूचर कन्झ्यूमरमधील (Future Consumer) शेअरहोल्डर्सना प्रत्येक 10 शेअरमागे FEL चे 9 शेअर मिळतील. त्यांचा फायदा आहे कारण यातील समभाग मूल्य वाढलं आहे. फ्यूचर कन्झ्यूमरचे समभाग मुल्य 11.5 रुपयांवरून वाढून 18 रुपये झाले आहे.

(हे वाचा-मोदी सरकारकडून स्वस्त सोनेखरेदीची शेवटची संधी, वाचा कसा करून घ्याल फायदा)

-फ्यूचर लाइफस्टाइलमधील (Future Lifestyle) शेअरहोल्डर्सना प्रत्येक 10 शेअरमागे FEL चे 116 शेअर मिळतील. फ्यूचर लाइफस्टाइलचे समभाग मुल्य 145 (Closing Price) रुपयांवरून वाढून 232 रुपये झाले आहे.

-फ्यूचर रिटेलमधील (Future Retail) शेअरहोल्डर्सना प्रत्येक 10 शेअरमागे FEL चे 101 शेअर मिळतील. फ्यूचर रिटेलचे समभाग मुल्य 135.20 रुपये या क्लोजिंग प्राइसवरून वाढून 202 रुपये झाले आहे.

-फ्यूचर सप्लाय चेनच्या (Future Supply Chain) शेअरहोल्डर्सना प्रत्येक 10 शेअरमागे FEL चे 131 शेअर मिळतील. फ्यूचर सप्लाय चेनचे समभाग मुल्य 151  रुपये या क्लोजिंग प्राइसवरून वाढून 262 रुपये झाले आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 30, 2020, 10:44 AM IST

ताज्या बातम्या