मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Jio-bp Mobility Station : रिलायन्स-बीपी मोबिलिटी लिमिटेडचं पहिलं मोबिलिटी स्टेशन नवी मुंबईत सुरू

Jio-bp Mobility Station : रिलायन्स-बीपी मोबिलिटी लिमिटेडचं पहिलं मोबिलिटी स्टेशन नवी मुंबईत सुरू

जिओ-बीपी हा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited) आणि बीपी यांचा संयुक्त उपक्रम आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या 1400 हून अधिक फ्युएल पंप्सच्या (Fuel Pumps Network) जाळ्याचं जिओ-बीपी (Jio-bp) या नावाने रिब्रँडिंग केलं जाणार आहे.

जिओ-बीपी हा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited) आणि बीपी यांचा संयुक्त उपक्रम आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या 1400 हून अधिक फ्युएल पंप्सच्या (Fuel Pumps Network) जाळ्याचं जिओ-बीपी (Jio-bp) या नावाने रिब्रँडिंग केलं जाणार आहे.

जिओ-बीपी हा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited) आणि बीपी यांचा संयुक्त उपक्रम आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या 1400 हून अधिक फ्युएल पंप्सच्या (Fuel Pumps Network) जाळ्याचं जिओ-बीपी (Jio-bp) या नावाने रिब्रँडिंग केलं जाणार आहे.

पुढे वाचा ...

नवी मुंबई, 26 ऑक्टोबर : रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेडतर्फे (RBML) नवी मुंबईत नावडे (Navade) येथे जिओ-बीपी ब्रँडचं पहिलं मोबिलिटी स्टेशन (Jio-bp Mobility Station) आज सुरू करण्यात आलं आहे. कोरोनाच्या आव्हानात्मक काळातून जग नुकतंच सावरू लागलं असताना जिओ-बीपीकडून जागतिक दर्जाच्या मोबिलिटी स्टेशन्सचं जाळं उभारलं जात असून, ग्राहकांना इंधनाचे विविध पर्याय (Fuel Options) या स्टेशन्सवर उपलब्ध असतील. जिओ-बीपी हा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited) आणि बीपी यांचा संयुक्त उपक्रम आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या 1400 हून अधिक फ्युएल पंप्सच्या (Fuel Pumps Network) जाळ्याचं जिओ-बीपी (Jio-bp) या नावाने रिब्रँडिंग केलं जाणार असून, येत्या काही महिन्यांत ग्राहकांना तिथे उत्तमोत्तम सुविधा दिल्या जाणार आहेत.

देशाची इंधनाची बाजारपेठ सातत्याने विस्तारत आहे. येत्या 20 वर्षांत भारत ही जगातली सर्वांत वेगाने वाढणारी इंधन बाजारपेठ बनेल, असा अंदाज आहे. इंधनाची ही वाढती गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिओ-बीपी मोबिलिटी स्टेशन्सची (Jio-bp Mobility Stations) रचना करण्यात आली आहे. तसंच ग्राहकांच्या सोयीच्या ठिकाणी ही स्टेशन्स आहेत. या स्टेशन्समध्ये अॅडिटिव्हाइज्ड फ्युएलसह (Additivised Fuel) इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग (Electric Vehicle Charging), ग्राहकांसाठी रिफ्रेशमेंट आणि फूड उपलब्ध केलं जाणार असून, आगामी काळात कमीत कमी कार्बन उत्सर्जन करणारी इंधनं तिथे उपलब्ध केली जाणार आहेत.

अनेक परिस्थितीत महत्त्वाचा ठरतो Car Insurance, विमा काढताना या गोष्टी लक्षात ठेवाच

देशभरात रिलायन्सच्या सेवांचं व्यापक जाळं असून, रिलायन्स रिटेल आणि जिओचे कोट्यवधी ग्राहक आहेत. त्यामुळे रिलायन्सचा देशांतर्गत बाजारपेठेतला अनुभव आणि बीपीचा जागतिक पातळीवरचा अनुभव या दोन्हींचा संगम जिओ-बीपी मोबिलिटी स्टेशन्सच्या रूपाने घडून आला आहे. उच्च दर्जाची वैशिष्ट्यपूर्ण इंधनं, ल्युब्रिकंट्स, कमी कार्बन उत्सर्जन करणारी इंधनं आदींच्या बाबतीत बीपी या कंपनीचा जागतिक पातळीवरचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे जिओ-बीपी या संयुक्त उपक्रमात या क्षेत्राचं नेतृत्व करणाची क्षमता आहे.

नेहमीच्या पेट्रोल-डिझेलऐवजी जिओ-बीपी मोबिलिटी स्टेशन्सवर अॅडिटिव्हाइज्ड फ्युएल म्हणजेच विशेष प्रक्रियायुक्त पेट्रोल-डिझेल उपलब्ध होणार आहे. त्यासाठी कोणतीही अतिरिक्त किंमत आकारली जाणार नाही. त्या इंधनामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर विकसित करण्यात आलेल्या अॅक्टिव्ह टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे. हे इंधन वाहनात भरल्यावर इंजिनच्या महत्त्वाच्या पार्ट्सवर एक संरक्षक थर तयार होतो. त्यामुळे इंजिन्स स्वच्छ राहण्यास मदत होते.

ओला कंपनीनं केलं इलेक्ट्रि्क हायपर चार्जर लॉन्च; स्कूटरला 18 मिनिटांत करा चार्ज

याशिवाय जिओ-बीपीकडून आपल्या सर्व मोबिलिटी स्टेशन्सवर इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन्स आणि बॅटरी स्वॅप स्टेशन्स उभारली जाणार आहेत. तसंच, मोबिलिटी पॉईंट्स या नावाने काही स्वतंत्र स्टेशन्सही उभारली जाणार आहेत. भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा उभारण्यात आघाडी घेण्याचं उद्दिष्ट जिओ-बीपीने ठेवलं आहे.

जिओ-बीपी मोबिलिटी स्टेशन्सवर ग्राहकांसाठी वाईल्ड बीन कॅफेच्या रूपाने रिफ्रेशमेंटची सोय करण्यात आली आहे. वाईल्ड बीन कॅफे हा बीपीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा ब्रँड आहे. आपल्या सिग्नेचर कॉफीसह मसाला चहा, सामोसा, उपमा, पनीर टिक्का रोल, चॉकलेट लाव्हा केक आदी वैविध्यपूर्ण पदार्थ तिथे उपलब्ध असतील. रिलायन्स रिटेल या देशातल्या सर्वांत मोठ्या रिटेलरचं 24X7 शॉपही तिथे असेल.

तुम्ही खरेदी केलेली जुनी कार चोरीची तर नाही ना? कसं ओळखायचं?

त्याशिवाय कॅस्ट्रॉलसोबतच्या (Castrol) पार्टनरशिपअंतर्गत जिओ-बीपीच्या मोबिलिटी स्टेशन्समध्ये एक्स्प्रेस ऑउल चेंज आउटलेट्सही असतील. तिथे मोफत व्हेइकल हेल्थ चेकअपसह ऑइल-चेंज सुविधा टू-व्हीलर ग्राहकांना दिली जाणार आहे. कॅस्ट्रॉल ल्युब्रिकंटची खरेदी करणाऱ्यांना मोफत ऑइल चेंज सुविधा पुरवली जाणार आहे.

ग्राहकांनी मोजलेला प्रत्येक रुपया वसूल होण्याच्या दृष्टीने ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं जिओ-बीपीने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. डायनॅमिक प्रायसिंग, इन्स्टंट डिस्काउंट्स, हॅपी अवर स्कीम्स, सुलभ डिजिटल पेमेंट अशा सर्व सेवा-सुविधाही येथे उपलब्ध असतील.

First published:

Tags: Petrol and diesel, Reliance Industries Limited, Reliance Jio