नवी दिल्ली, 04 मे : अमेरिकेतील मोठी प्रायव्हेट इक्विटी कंपनी सिल्व्हर लेक (Silver Lake) रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म (Reliance Jio) मध्ये गुंतवणूक करणार आहे. या करारानुसार सिल्व्हर लेकने 75 कोटी डॉलर म्हणजेच 5,655.75 कोटींची गुंतवणूक जिओमध्ये करून 1.15 टक्के भागीदारी घेतली आहे. या करारानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजसह भारताला मोठा फायदा होणार आहे. या करारामुळे नवीन उत्पादन क्षमता वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या करारामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ची टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओचे बाजार मूल्य 5.15 लाख कोटी रुपये झाले आहे. या करारासंबंधित 5 महत्त्वाचे मुद्दे 1. 12.5 प्रीमियमवर झाला करार - फेसबुकच्या तुलनेत (Facebook) सिल्व्हर लेकबरोबरचा करार अधिक आकर्षक आहे. 2. अनेक मुद्द्यांमुळे हा करार फायदेशीर- तंत्रज्ञानासंबधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये सिल्व्हर लेक (Silver Lake) जगभरातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचा AUM (अॅसेट्स अंडर मॅनेजमेंट) 43 अब्ज डॉलर इतका आहे. कंपनीने 100 हून अधिक ठिकाणी गुंतवणूक केली आहे. या कंपनीचे काही अधिकारी सिलिकॉन व्हॅली, न्यूयॉर्क, हाँगकाँग आणि लंडनमध्ये आहेत (हे वाचा- 45 मिनिटांत मिळवा 5 लाखांचं कर्ज, 6 महिने EMI नाही! ‘या’ बॅंकेनं सुरू केली सेवा ) 3. आयआरएलचे चेअरमन मुकेश अंबानी हे या कराराचे स्वागत करून असं म्हणाले की, आम्हाला सिल्व्हर लेकबरोबर पार्टनरशीप करून अत्यंत आनंद होत आहे. यामुळे भारतीय डिजिटल सिस्टिममध्ये आमुलाग्र बदल होतील आणि त्यामुळे या क्षेत्राची वृद्धी देखील होईल. 4. मुकेश अंबानी यांनी दिलेल्या माहितीनुसार या डीलमुळे भारतातील डिजिटल सोसायटीला मोठा फायदा होईल. सिल्व्हर लेकचा रेकॉर्ड खूप चांगला आहे आणि त्यांच्या कंपनीचं टेक व फायनान्समध्ये मोठं नाव आहे, त्यामुळे या करारामुळे आम्ही आता खूप उत्साहित आहोत असंही ते म्हणाले. 5. भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी- 2016 मध्ये रिलायन्स जिओ लाँच करण्यात आले होते. 3 वर्षातच जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनले आहे. जिओचे सध्या 34 कोटींपेक्षा अधिक ग्राहक आहेत. आता जिओची मार्केट वॅल्यू वाढून 5.15 लाख कोटी इतकी झाली आहे. (संबधित- Reliance Jio-Silver Lake यांच्यातील कराराचा ग्राहकांना काय होणार फायदा? ) तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या काळात जिओ आणखीन ग्राहकांसाठी नवीन उत्पादनं सुरू करू शकते. नुकतच रिलायन्सच्या व्हेंचर जिओ मार्टनं ग्राहकांसाठी एक योजना आणली आहे. त्यांनी 88500 08000 नंबर जारी केला आहे. या नंबरद्वारे आपण किराणा साहित्याची ऑर्डर देऊ शकता. सध्या जिओ मार्टने नवी मुंबई, कल्याण आणि ठाणे यासारख्या मुंबई उपनगरी भागात ही सेवा सुरू केली आहे. संपादन - जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.