Reliance Jio-Silver Lake यांच्यातील कराराचा ग्राहकांना काय होणार फायदा?

Reliance Jio-Silver Lake यांच्यातील कराराचा ग्राहकांना काय होणार फायदा?

सिल्वर लेक फर्मनं जिओमध्ये गुंतवणूक केल्यानं ग्राहकांना काय होणार फायदा, जाणून घ्या

  • Share this:

मुंबई, 04 मे : रिलायन्स जिओ आणि सिल्वर लेक फर्मनं एक करार केला आहे. या करारानुसार सिल्वर लेक फर्मनं 5,655.75 कोटींची गुंतवणूक जिओमध्ये करून 1.15 टक्के भागीदारी घेतली आहे. या करारानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजसह भारताला मोठा फायदा होणार आहे. या करारामुळे नवीन उत्पादन क्षमता वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या काळात जिओ आणखीन ग्राहकांसाठी नवीन उत्पादनं सुरू करू शकते. नुकतच रिलायन्सच्या व्हेंचर जिओ मार्टनं ग्राहकांसाठी एक योजना आणली आहे. त्यांनी 88500 08000 नंबर जारी केला आहे. या नंबरद्वारे आपण किराणा साहित्याची ऑर्डर देऊ शकता. सध्या जिओ मार्टने नवी मुंबई, कल्याण आणि ठाणे यासारख्या मुंबई उपनगरी भागात ही सेवा सुरू केली आहे.

सिल्वर लेक फर्मनं जिओमध्ये गुंतवणूक केल्यानं ग्राहकांना काय होणार फायदा

SBI कॅपिलच्या म्हणण्यानुसार दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा हा करार अधिक चांगला झाला आहे. याचा फायदा RIL Rights Issue साठी होऊ शकतो असंही त्यांचं म्हणणं आहे.

मागच्या आठवड्यात रिलायंस इंडस्ट्रीजच्या बोर्डाच्या बैठकीमध्ये 53,125 कोटी रुपयांच्या RIL Rights Issue साठी मंजुरी देण्यात आली होती.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे CMD मुकेश अंबानी यांनी 2021 पर्यंत कंपनी कर्जमुक्त करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. रिलायन्स आपला हिस्सा विकत आहे. रिलायन्सने सौदी अरेबियाची तेल कंपनी अरामकोबरोबर हा भाग विकण्यासाठी करारही केला आहे. हा करार उशीर झाला आहे. या व्यतिरिक्त किरकोळ व्यवसायात बीपी बरोबर करार करण्यात आला आहे.

हे वाचा-आज करोडो खात्यांमध्ये सरकारने पाठवले पैसे, जाणून घ्या तुम्हाला कधी मिळणार रक्कम?

हे वाचा-मोठी बातमी, फेसबुकनंतर आता Jio मध्ये Silver Lake करणार 5,655 कोटींची गुंतवणूक

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 4, 2020, 2:15 PM IST

ताज्या बातम्या