Home /News /money /

Reliance समूहाचा आणखी एक मोठा करार, डेनमार्कच्या Stiesdal सह पार्टनरशिप; वाचा सविस्तर

Reliance समूहाचा आणखी एक मोठा करार, डेनमार्कच्या Stiesdal सह पार्टनरशिप; वाचा सविस्तर

रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडने (RNESL partnership with Stiesdal A/S) Stiesdal A/S सह भागीदारी केली आहे. दोन्ही कंपन्या मिळून हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर बनवतील.

    मुंबई, 13 ऑक्टोबर: रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industry New Deal) ऊर्जा क्षेत्रात आणखी एक मोठा करार केला आहे. RIL ने 12 ऑक्टोबर रोजी घोषणा केली की त्यांचे सोलर युनिट रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडने (RNESL partnership with Stiesdal A/S) Stiesdal A/S सह भागीदारी केली आहे. दोन्ही कंपन्या मिळून हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर बनवतील. रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड (आरएनईएसएल) ने मंगळवारी एक्सचेंजला दिलेल्या माहितीमध्ये याबाबत माहिती दिली. Stiesdal A/S ही डेनमार्कची कंपनी आहे. ही कंपनी क्लायमेट चेंज मिटिगेशनशी संबंधित कमर्शलाइझ तंत्रज्ञान तयार करते. Stiesdal ची स्थापना हेनरिक स्टीएसडल (Henrik Stiesdal) द्वारे करण्यात आली आहे. पवन ऊर्जेच्या क्षेत्रात ही जगातील आघाडीची कंपनी आहे. तसेच, जागतिक नवीकरणीय उद्योगात एक वेगळा विचार करणारी ही कंपनी आहे. वाचा-दरमहा पैसे कमावण्यासाठी SBI ची ही स्कीम ठरेल BEST! वाचा काय आहेत फायदे या तंत्रज्ञानामुळे खर्च होईल कमी Stiesdal हवामान संकटाचा सामना करण्यासाठी अनेक तंत्रज्ञानाच्या विकास आणि व्यापारीकरणात गुंतलेली आहे. हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर्सच्या नवीन तंत्रज्ञानामध्ये ऊर्जा उत्पादनाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी करण्याची क्षमता आहे. या प्रक्रियेमुळे सध्या उपलब्ध तंत्रज्ञानापेक्षा स्वस्त ग्रीन हायड्रोजन बनवण्याचा मार्ग खुला होत आहे. भारताच्या हरित ऊर्जा क्षेत्रात निश्चित केलेले लक्ष्य साध्य करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असेल. रविवारी करण्यात आलं आणखी एक डील रिलायन्स न्यू एनर्जी सोलर (Reliance New Energy Solar) ने रविवारी 10 ऑक्टोबर रोजी अशी माहिती दिली की, त्यांनी 5792 कोटी रुपयांमध्ये (771 मिलियन डॉलर) आरईसी सोलर होल्डिंग्जचे  (REC Solar Holdings) अधिग्रहण केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) ची संपूर्ण मालकीची उपकंपनी रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड (आरएनईएसएल) ने चायना नॅशनल ब्लूस्टार (ग्रुप) कंपनी लिमिटेड कडून आरईसी सोलर होल्डिंग्ज एएस (आरईसी ग्रुप) ची 100 टक्के भागीदारी घेण्याची घोषणा केली होती. वाचा-PM मोदी आज 'गति शक्ती योजना' करणार लाँच, देशाला मिळणार ही 100 लाख कोटींची भेट रिलायन्सच्या  न्यू एनर्जी व्हिजनसाठी जागतिक स्तरावर फोटोव्होल्टिक (PV) मॅन्युफॅक्चरिंग  प्लेअर  होण्यासाठी हे अधिग्रहण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हे अधिग्रहण रिलायन्स समूहासाठी 2030 पर्यंत 100 GW सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. या वर्षापर्यंत भारताने 450 गिगावॅट नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. (डिस्क्लेमर- नेटवर्क 18 आणि टीव्ही 18 कंपन्या चॅनेल/वेबसाइटचे संचालन करतात, ज्याचे नियंत्रण स्वतंत्र मीडिया ट्रस्टद्वारे केले जाते, ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.)  
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Reliance, Reliance group, Reliance Industries, Reliance Industries Limited

    पुढील बातम्या