EPFO मध्ये 2 हजाराहून जास्त जागांवर नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज

EPFO मध्ये 2 हजाराहून जास्त जागांवर नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज

EPFO jobs, Recruitment- या पदांवर सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळेल.

  • Share this:

मुंबई, 28 जून : एम्प्लाॅयी  प्राॅव्हिडंट फंड आॅफ इंडिया ( EPFO )मध्ये नोकरीची मोठी संधी आहे. EPFOनं सोशल सिक्युरिटी असिस्टंट ( SSA )साठी 2,189 जागांवर भरती करण्यासाठी अर्ज मागवलेत. EPFO SSA व्हेकन्सीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 21 जुलै 2019.

SSAसाठी पगार

या पदासाठीचा पगार Pay Matrix Level- 4च्या अंतर्गत असेल. या पदासाठी सुरुवातीला 25,500 रुपये पगार मिळेल. हा पगार सातव्या वेतन आयोगाप्रमाणे दिला जाईल. उमेदवारांनी www.epfindia.gov.in इथे लाॅग इन करून अधिक माहिती घ्यावी.

रेल्वेची खास भेट, 'या' पदांवर 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित

मोदी सरकार 2020पर्यंत देणार सगळ्यांना घरं, 'असं' सुरू आहे काम

असा करा अर्ज

www.epfindia.gov.in वर जा.

Recruitment वर क्लिक करा.

Recruitment to the post of Social Security Assistant in EPFO वर क्लिक करा.

Apply Online लिंकवर क्लिक करा.

for Registration टॅबवर क्लिक करून नाव, काॅन्टॅक्ट डिटेल्स आणि ईमेल आयडी एंटर करा.

प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल.

याचा वापर करून लाॅगइन करा आणि आॅनलाइन फाॅर्म भरा.

FINAL SUBMITवर क्लिक करा.

'Payment'वर क्लिक करून पैसे भरा.

फाॅर्मची प्रिंटआऊट काढा.

बँकेत एकापेक्षा जास्त अकाउंट आहेत? मग होईल 'हे' नुकसान

सध्या रोजगार वाढवले जातायत. EPFO ने एप्रिल 2018 पासूनची एम्प्लॉयमेंटची माहिती जाहीर केली आहे. या माहितीनुसार जानेवारी 2018 च्या तुलनेत जानेवारी 2019 मध्ये 131% लोकांनी EPFO वर नोंद केली आहे. जानेवारी 2018 मध्ये 3.87 लाख लोकांनी EPFO वर रजिस्टर केलं होतं.

ईपीएफओने सप्टेंबर 2017 पासून आत्तापर्यंतचा डेटा जाहीर केला आहे. यानुसार सप्टेंबर 2017 मध्ये 2.75 लाख नव्या नोकऱ्या तयार झाल्या होत्या. तर सप्टेंबर 2017 ते जानेवारी 2019 च्या काळात 76.48 लाख लोकांनी ईपीएफओवर नोंद केली आहे. म्हणजेच इतक्या नवीन लोकांना नोकऱ्या मिळाल्या.

देवळाली रेंजमधला हा VIDEO पाहून नक्कीच पाकिस्तानला धास्ती वाटेल

First published: June 28, 2019, 7:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading