मुंबई, 28 जून : मोदी सरकारचं लक्ष्य आहे की 2022पर्यंत प्रत्येक कुटुंबाकडे स्वत:चं घर असायला हवं. यासाठी जोरदार काम सुरू आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गाव आणि शहर मिळून आतापर्यंत 1 कोटी सात लाख घरं बांधली गेलीयत. ग्रामीण भागांमध्ये 81 लाखाहून जास्त शहरांमध्ये 26 लाख घरं गरिबांसाठी बांधली गेलीयत. त्यात लोक राहायलाही लागलेत. सरकारचा जोर ग्रामीण क्षेत्रावर आहे. कारण इथे जास्त गरीब आहेत. म्हणून घर बांधण्याचं लक्ष्यही मोठं आहे. गावांसाठी आतापर्यंत 99 लाख घरांची स्वीकृती मिळालीय. रेल्वेची खास भेट, ‘या’ पदांवर 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत सांगितलं, ‘आवास योजनेअंतर्गत 2.95 कोटी घरं बांधण्याचं लक्ष्य आहे. सामाजिक, आर्थिक, जाती आधारित जनगणना 2011च्या डेटावरून 20 जूनपर्यंत देशात घरांसाठी 2.53 कोटी गरजू नक्की केलेत. त्यांना 2021-22पर्यंत मदत मिळेल. ’ आवास योजनेअंतर्गत गावातल्या बेघरांसाठी 1.20 लाख रुपये, शौचालयासाठी 12 हजार रुपये आणि घर बांधण्यासाठी 15 हजार रुपये वेतनाचे पैसे मिळतात. या योजनेची सुरुवात 25 जून 2015ला झाली होती. पाणी संकट दूर करण्यासाठी बजेटमध्ये होऊ शकते ‘ही’ मोठी घोषणा कसं पूर्ण करणार लक्ष्य? सर्व राज्यांमध्ये वेगळं बँक खातं उघडलं गेलंय. गरजूंच्या अकाउंटमध्ये थेट पैसा पाठवला जातोय. योजनेअंतर्गत आवास अॅपद्वारे कामावर लक्ष ठेवलं जातंय.
बजेटमध्ये महिलांना मिळू शकतात 3 मोठ्या सवलती, तयार झाला प्लॅन
कोणाला मिळणार फायदा? या योजनेसाठी गरजूंची निवड सामाजिक, आर्थिक, जाती आधारित जनगणना 2011प्रमाणे झालीय. ज्या लोकांकडे घर नाही, जे भूमिहीन आहेत, एक किंवा दोन खोल्यांच्या कच्च्या घरांमध्ये राहतात, त्यांना ही मदत मिळू शकते. यात पहिला नंबर मध्य प्रदेशाचा आहे. तिथे 15,18,001 घरं दिली जातील. दुसरा नंबर पश्चिम बंगालचा आहे. तिथे 13,92,984 घरं बांधली जाणार आहेत. उत्तर प्रदेशचा तिसरा नंबर आहे. तिथे 12,78,115 घरं बांधली जातील. मागणी वाढली की घरं बांधण्याचं लक्ष्यही वाढणार पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरात 26 लाख घरं बांधलीयत. 47.5 लाख घरांचं बांधकाम सुरू आहे. एकूण 81 लाख घरांना मंजुरी मिळालीय. शहरात 1 कोटी घरांना मागणी आहे. शहरात गरिबांसाठी घरं बांधण्यासाठी सरकारनं 51,113 कोटी रुपये मदत दिलीय. हे लक्ष्य वाढू शकतं, असंही सांगण्यात आलंय. गच्चीतून पडलेल्या चिमुकलीसाठी ‘तो’ ठरला देवदूत; VIDEO VIRAL