जाहिरात
मराठी बातम्या / मनी / रेल्वेची खास भेट, 'या' पदांवर 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित

रेल्वेची खास भेट, 'या' पदांवर 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित

तात्काळ तिकिटाचं बुकिंग करण्याच्या आधी प्रवाशाचे नाव, वय आणि इतर तपशील भरून ठेवले. त्यामुळे कन्फॉर्म तिकिट मिळण्याची आशा आपण बाळगू शकतो.

तात्काळ तिकिटाचं बुकिंग करण्याच्या आधी प्रवाशाचे नाव, वय आणि इतर तपशील भरून ठेवले. त्यामुळे कन्फॉर्म तिकिट मिळण्याची आशा आपण बाळगू शकतो.

Railway Recruitment, Piyush Goyal - रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी महिलांना मोठी भेट दिलीय

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 जून : रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी महिलांना मोठी भेट दिलीय. त्यांनी एक घोषणा केलीय. भारतीय रेल्वेत 9 हजारांहून जास्त काॅन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर पदांवर भरती केली जाणार आहे. त्यात 50 टक्के जागा महिलांना दिल्या जातील. महिलांसाठी ही मोठी संधी आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं होतं की सध्या भारतीय रेल्वेत 15.06 लाख कर्मचारी आहेत. त्यात 12.23 लाख कर्मचारी पे रोलवर आहेत. उरलेली 2.82 लाख पदं रिकामी आहेत. म्हणूनच त्यांनी पुढच्या दोन वर्षात 2.3 लाख पदं भरण्याची घोषणा केली होती. बजेटमध्ये महिलांना मिळू शकतात 3 मोठ्या सवलती, तयार झाला प्लॅन 1.31 लाख पदांवरच्या नवी भरतीचा पहिला टप्पा सरकारच्या आरक्षण नीतीप्रमाणे सुरू केला जाईल. यात जवळजवळ 19,715; 9,857 आणि 35,485 अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर मागासवर्गासाठी आरक्षित असेल. बँकेत एकापेक्षा जास्त अकाउंट आहेत? मग होईल ‘हे’ नुकसान सध्या रेल्वेत बऱ्याच जागांवर भरती केली जाणार आहे.  वेस्टर्न रेल्वेनं वेगवेगळ्या पदांसाठी एकूण 725 व्हेकन्सी काढल्यात. यामध्ये 135 पोस्ट्स स्टेशन मास्टरसाठी आहेत. 229 पदं Goods Guard, Senior Commercial cum Ticket Clerk साठी आहेत. तर 238 व्हेकन्सी Commercial Cum Ticket Clerk साठी आहे. 123 जागा ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टसाठी आहे.

पाणी संकट दूर करण्यासाठी बजेटमध्ये होऊ शकते ‘ही’ मोठी घोषणा

तसंच सेंट्रल रेल्वेमध्ये एकूण 2150 पदांवर भरती केली जातेय. त्यात ज्युनियर इंजीनियर, कमर्शियल क्लर्क, पाॅइंटमॅन, सीनियर सेक्शन इंजीनियर अशा अनेक पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करावेत. या पदांसाठी मुंबई सेंट्रल रेल्वेत काम केलेले माजी कर्मचारीही अर्ज करू शकतात. पण यांना फक्त महिन्याचा पगार मिळेल. त्यांना पेन्शन, अंतिम वेतन, सीएल, पीएल या सुट्ट्या मिळणार नाहीत. उमेदवारांची निवड लिखित परीक्षा आणि इंटरव्ह्यूच्या आधारे केली जाईल. या पदांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै आहे. VIDEO: दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे- मोदी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: railway
  • First Published :
जाहिरात
जाहिरात