बँकेत एकापेक्षा जास्त अकाउंट आहेत? मग होईल 'हे' नुकसान

बँकेत एकापेक्षा जास्त अकाउंट आहेत? मग होईल 'हे' नुकसान

Bank Accounts, Savings - बँकेत एकापेक्षा जास्त अकाउंट असणं योग्य नाही. का ते घ्या जाणून

  • Share this:

मुंबई, 28 जून : हल्ली बऱ्याच लोकांकडे बँकेत एकापेक्षा जास्त अकाउंट असतात. गरज नसतानाही लोक एकापेक्षा जास्त अकाउंट उघडतात. पण नंतर ते या खात्यांना मेन्टेन करू शकत नाहीत. नोकरदारांची बऱ्याचदा दोन अकाउंट असतात. एक त्यांचं सॅलरी अकाउंट आणि दुसरं त्यांचं पर्सनल सेव्हिंग अकाउंट. पण यामुळे नुकसान होऊ शकतं.

असं होईल नुकसान

सेव्हिंग अकाउंटमध्ये कमीत कमी रक्कम ठेवण्याचे बँकेचे नियम असतात. असं नाही केलं तर बँक दंड वसूल करते. अनेक बँकांमध्ये कमीत कमी बॅलन्स 10 हजार रुपये असतो. अशा वेळी तुमच्याकडे दोनपेक्षा जास्त अकाउंट असेल तर तुमची चिंता वाढू शकते. कारण सर्वसामान्यांना सेव्हिंग अकाउंटमध्ये 20 हजार रुपये जमा करणं कठीण होऊन जातं.

मोदी सरकारच्या या निर्णयामुळे 8 कोटी PF धारकांना बसेल मोठा धक्का

इन्कम टॅक्स फाइल करण्यात अडचण

जास्त बँकांमध्ये अकाउंट असेल तर टॅक्स जमा करण्यात बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं. कागदावर बरीच डोकेफोड करावी लागेल. सोबत इन्कम टॅक्स फाइल करताना बँकांच्या खात्यासंबंधी माहिती द्यावी लागेल. हे खूप किचकट काम होईल.

स्विस बँकेत भारतीयांचे 99 लाख कोटी रूपये; SNB Reportमधून खुलासा

जास्त चार्जेस भरावे लागतात

अनेक अकाउंट असली की तुम्हाला वर्षाला मेन्टेनन्स फी आणि सर्विस चार्ज द्यावा लागतो. क्रेडिट आणि डेबिट कार्डाशिवाय बँक सुविधांसाठी बँक तुमच्याकडून जास्त पैसे आकारतं. म्हणजे इथे तुमचे जास्त पैसे खर्च होतात.

नेहमीच्या अभ्यासाचा कंटाळा आला? मग निवडा ही ऑफबीट करियर

चांगलं व्याज मिळत नाही

एकापेक्षा जास्त बँकांमध्ये अकाउंट असेल तर कमी व्याज मिळतं. एकापेक्षा जास्त अकाउंट असल्यानं तुमची मोठी रक्कम बँकेत अडकते. त्यावर तुम्हाला जास्तीत जास्त 4 ते 5 टक्के वर्षाला रिटर्न मिळतात. त्याऐवजी तुम्ही ते पैसे दुसरीकडे गुंतवून जास्त फायदा मिळवू शकता.

फुटबॉल खेळणारा हत्ती कधी पाहिलाय का? VIDEO व्हायरल

First published: June 28, 2019, 12:36 PM IST

ताज्या बातम्या