'चाय पे चर्चा', आता PM मोदींसोबत मिळणार चहा पिण्याची संधी

नरेंद्र मोदी सरकारनं इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक नवी योजना आणलीय

News18 Lokmat | Updated On: Jun 3, 2019 01:20 PM IST

'चाय पे चर्चा', आता PM मोदींसोबत मिळणार चहा पिण्याची संधी

मुंबई, 03 जून : नरेंद्र मोदी सरकारनं इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक नवी योजना आणलीय. कर भरायला जनतेला उद्युक्त करावं यासाठी ही आयडिया भन्नाट आहे.

काय करणार सरकार?

सरकारच्या या योजनेअंतर्गत सर्वात जास्त कर भरणाऱ्या व्यक्तींना अर्थमंत्री किंवा पंतप्रधान यांच्या सोबत चहा पिण्याची संधी मिळणार. त्यांना चाय पे चर्चा करायला मिळणार. सरकार अगोदरच नाॅन माॅनेटरी इन्सेंटिव्ह देत होतीच. पण आता करदात्यांना पंतप्रधानांसोबत 'चाय पे चर्चा' ची संधी देऊन कर भरण्यास प्रोत्साहित करतेय.

मोदी सरकार देतेय वर्षाला 10 लाख रुपये कमवण्याची संधी, सुरू करा 'हा' व्यवसाय

मिंटच्या माहितीनुसार सरकारचा प्रयत्न इन्कम टॅक्स कलेक्शन वाढवणं आहे. नरेंद्र मोदी सरकारला आपली कर व्यवस्था जास्त प्रभावी बनवायची आहे. कदाचित पहिल्या बजेटमध्येच सरकार ही घोषणा करेल.

Loading...

राधाकृष्ण विखेंनी सुरू केली आवराआवर, राज्यातही आता विरोधी पक्षनेता नाही?

याआगोदरही नरेंद्र मोदींनी कर भरणाऱ्यांचे आभार मानलेत. पण आता पंतप्रधानांबरोबर चहा पिण्याच्या योजनेमुळे टॅक्स कलेक्शन  जास्त होईल, अशी आशा वाटते. आतापर्यंत टॅक्स डिपार्टमेंट सर्वात जास्त कर भरणाऱ्यांना अॅप्रिसिएशन सर्टिफिकेट देईल.

महिलेला स्वतःच्याच हाताने करावी लागली प्रसूती..नागपुरातील धक्कादायक प्रकार

31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात सरकारनं 12 लाख कोटी रुपये कर गोळा केला होता.

सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळात कल्याण योजनांमध्ये वाढ करणार आहे. त्यासाठी फंडाची गरज आहे. सरकार आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM-KISAN)चा फायदा देऊ इच्छितेय. यात सरकारचा खर्च वाढणार आहे आणि त्याची भरपाई कर गोळा करूनच होईल.VIDEO : भाजप आमदाराकडून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2019 01:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...