पुणे जिल्हा परिषदेत नोकरीची संधी, 'या' पदांसाठी 33 जागांवर भरती

पुणे जिल्हा परिषदेत नोकरीची संधी, 'या' पदांसाठी 33 जागांवर भरती

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत विविध पदांची भरती सुरू आहे

  • Share this:

पुणे, 03 जून : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात? तुम्हाला महाराष्ट्रात नोकरी करायचीय? मग तुम्हाला उत्तम संधी आहे. पुणे जिल्हा परिषदेत नोकरीची संधी आलीय. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत विविध पदांची भरती सुरू आहे. वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर,असिस्टंट नर्सिंग को ऑर्डिनेटर या पदांसाठी उमेदवार हवेत. एकूण 33 जागा आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदासाठी 6 जागा, स्टाफ नर्ससाठी 25 जागा, प्रोजेक्ट कोआॅर्डिनेटरसाठी 1 जागा आणि असिस्टंट नर्सिंग को ऑर्डिनेटरसाठी 1 जागा अशा 33 जागांवर नियुक्ती केली जाणार आहे.

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, तूरडाळ झाली 100 रुपये किलो

वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS, DCH/MD असणं आवश्यक आहे. तर स्टाफ नर्ससाठी B.Sc.(नर्सिंग) /GNM   ही पदवी हवी. प्रोजेक्ट कोआॅर्डिनेटरसाठी  MBBS, MD/ DNB हवं. असिस्टंट नर्सिंग को ऑर्डिनेटर पदासाठी B.Sc.(नर्सिंग) /GNM असणं गरजेचं आहे.

'चाय पे चर्चा', आता PM मोदींसोबत मिळणार चहा पिण्याची संधी

मोदी सरकार देतेय वर्षाला 10 लाख रुपये कमवण्याची संधी, सुरू करा 'हा' व्यवसाय

नोकरीचं ठिकाण पुणे राहील. अर्जाची फी नाही. अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी  कार्यालय, आरोग्य विभाग 4था मजला, जिल्हा परिषद, पुणे या पत्त्यावर पाठवा. अर्ज देण्याची शेवटची तारीख आहे 10 जून 2019.

वैद्यकीय अभ्यासक्रम करणाऱ्यांची संख्या बरीच मोठी असते. या क्षेत्राला मागणीही खूप आहे. तुम्ही इथे संधी घेऊ शकता.

अधिक माहितीसाठी http://www.punezp.org/  इथे संपर्क साधा.

VIDEO : सुशीलकुमार शिंदे ते सलमान खान...बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला दिग्गजांची हजेरी

First published: June 3, 2019, 4:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading