Elec-widget

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, तूरडाळ झाली 100 रुपये किलो

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, तूरडाळ झाली 100 रुपये किलो

निवडणुका संपताच पुन्हा एकदा महागाई वाढायला लागलीय. या आठवड्यात तूरडाळीनं शंभरी गाठलीय.

  • Share this:

मुंबई, 03 जून : निवडणुका संपताच पुन्हा एकदा महागाई वाढायला लागलीय. या आठवड्यात तूरडाळीनं शंभरी गाठलीय. तूरडाळ प्रति किलो 100 रुपये झालीय. गेल्यो दोन महिन्यांमध्ये डाळीच्या दरात 36 रुपयांनी वाढ झालीय. तूरडाळीबरोबर मूग, मटकी, मसुर यांच्या किमतीही वाढल्यात. त्याचबरोबर शेंगदाणा, वरी यांच्या किमतीही चढ्या होतायत.

महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा इथे अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे धान्याचं उत्पादन कमी झालं. तूरडाळीत प्रति किलो 8 रुपये वाढ झाल्यानं ती 100 रुपयांवर पोचलीय. कच्ची तूर 39रुपये  ते 40 रुपये होती. त्यात 15 ते20 रुपयांनी वाढ झालीय.  कच्ची तूरडाळ 5 हजार 500 ते 5हजार 900 प्रति क्विंटल झालीय. त्यामुळे ग्राहकांपर्यंत पोचेपर्यंत ती 100 रुपये किलो झाली.

'चाय पे चर्चा', आता PM मोदींसोबत मिळणार चहा पिण्याची संधी

मोदी सरकार देतेय वर्षाला 10 लाख रुपये कमवण्याची संधी, सुरू करा 'हा' व्यवसाय

मसुर डाळ, मूगडाळीच्या दरात प्रति किलो 4 रुपयांनी वाढ झालीय. तर मटकीच्या दरात प्रति किलो 10 रुपयांनी वाढ झालीय. गेल्या दोन महिन्यात तूरडाळीचा दर वाढतच चाललाय. गेल्या आठवड्यात तो प्रति किलो 92 रुपये होता.

Loading...

तिसरी मुलगी झाली, आईने 10 दिवसाच्या चिमुकलीची गळा दाबून केली हत्या

मोठे व्यापारी हे सतत बाजारपेठेचा अंदाज, ग्राहकांची मागणी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि सरकारचं धोरण याकडे लक्ष ठेवून असतात. त्यातल्या बदलानुसार त्यांचे भाव ठरतात. त्यांनी भाव ठरवल्यानंतर त्याचा परिणाम देशपातळीवर होत असतो.

गेल्या नोव्हेंबरमध्ये तूरडाळ, मुगडाळ, चणाडाळ आणि मसुरडाळ 100 रुपये किलो झाली होती. उडीदडाळ 120 रुपयांवर पोचली होती. आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.


SPECIAL REPORT : नागाला वाचवण्यासाठी प्राणाची बाजी, विहिरीतील थरार कॅमेरात कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2019 02:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...