Home /News /money /

नावात सर्वकाही आहे! CORONA नावामुळे या उद्योगामध्ये आल्या अनेक समस्या, ग्राहकांच्या नाराजीमुळे मालकही त्रस्त

नावात सर्वकाही आहे! CORONA नावामुळे या उद्योगामध्ये आल्या अनेक समस्या, ग्राहकांच्या नाराजीमुळे मालकही त्रस्त

'कोरोना' या नावामुळे एका मोठ्या रिअल इस्टे व्यवसायाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

    नवी दिल्ली, 25 जुलै : 'कोरोना' व्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विविध व्यवसायांना, उद्योगांना नुकसान सहन करावे लागले आहे. दरम्यान 'कोरोना' या नावामुळे एका मोठ्या रिअल इस्टे व्यवसायाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.  एखाद्या व्यवसायाचे नाव खूप विचार करून ठेवले जाते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नावाची मोठी भूमिका असते. 2010 मध्ये रिअल इस्टेट बिझनेस लाँच करणाऱ्या जगमेंदर गुप्ता यांना अशाच हटके एका नावाचा शोध होता. ते एखादं लॅटिन नाव व्यवसायाला देण्याच्या विचारात होते आणि त्यांनी या व्यवसायाला 'कोरोना बिल्डकॉन' (Corona Buildcon) असं नाव दिले. दरम्यान त्यांना नक्कीच त्यावेळी ठाऊक नव्हते भविष्यात या नावामुळे त्यांना लाखांच्या नुकसानाला सामोरे जावे लागेल. गुडगावमध्ये त्यांच्या रिअल इस्टेटचे अपार्टमेंट्स आहेत. (हे वाचा-एक तोळा सोने खरेदी करण्यासाठी 52 हजार मोजण्यासाठी राहा तयार! इथे वाचा आजचे भाव) गुप्ता यांनी त्यावेळी अशी माहिती मिळवली होती की, कोरोना या नावाचा अर्थ उजेडाचे वर्तूळ असा होतो, जसे सूर्याभोवती चारी बाजुंना उजेड असतो. दरम्यान कोरोना व्हायरसबाबत रिसर्च करणाऱ्यांनी देखील असा शोध लावला आहे की, मायक्रोस्कोपवर या विषाणूचा आकार सूर्याभोवती असणाऱ्या चमकदार घेऱ्याप्रमाणे एक क्राउन असतो. यानंतर गुप्ता यांना त्यांनी निवडलेल्या नावामुळे समस्यांना सामोरे जावे लागत आहे. (हे वाचा-मोबाइलच्या एका क्लिकवर मागवू शकाल किराणा; JioMartचे अ‍ॅप लाँच!) गु्प्ता यांनी मंनीकंट्रोलशी बोलताना अशी माहिती दिली की, 'जेव्हा आम्ही काही दिवसांपूर्वी एका मंजुरीसाठी बँकेमध्ये गेलो होतो, तेव्हा या नावावरून अनेकांनी विचित्र कमेंट्स पास केल्या.' गुडगावमधील Corona Optus अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने अशी माहिती दिली की, 'जेव्हा ते प्रॉपर्टी संबधित टॅक्स जमा करण्यासाठी गेले होते. तेव्हा अधिकाऱ्यांनी देखील त्या नावाची खिल्ली उडवली. गुप्ता यांच्या रिअल इस्टेटमधीलच हे एक अपार्टमेंट आहे. (हे वाचा-मोठी बातमी! सरकारी बँकांमध्ये एका वर्षात 1.48 लाख कोटी रुपयांची फसवणूक) भविष्यात या नावामुळे आणखी समस्यांना सामोरे जावे लागेल अशी भीती गुप्ता यांना आहे. नुकतेच त्यांनी हरियाणाच्या सोहना याठिकाणी Corona Buildcon ने 226 युनिटचा प्रोजेक्ट तयार केला आहे, ज्याचे नाव 'कोरोना ग्रीन्स' आहे. हा प्रोजेक्ट राज्य सरकारच्या स्वस्त हाऊसिंग स्कीम अंतर्गत तयार करण्यात आल आहे. गुप्ता यांनी अशी माहिती दिली केली, काही खरेदीदारांना प्रॉपर्टी पसंत आली तरी केवळ नावामुळे ते खरेदी करणार नाहीत. त्यामुळे त्यांची कंपनी हे नाव बदलण्याचा विचार करत आहे. दरम्यान जे प्रोजेक्ट्स त्यांनी आधीच डिलिव्हर केले आहेत, त्यांचे नाव बदलण्यात येणार नाही. मात्र नवीन प्रोजेक्ट्समध्ये नाव बदलले जाऊ शकते अशी शक्यता आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या