नवी दिल्ली, 24 जुलै : डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचे मुल्य घसरल्यामुळे आणि कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे मौल्यवान धातुच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. सोन्याच्या किंमतीमध्ये शुक्रवारी (Gold Price Today) देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति तोळा 475 रुपयांनी वाढली आहे. दरम्यान चांदीच्या किंमती आज कमी झाल्या आहेत. काहीशा फरकाने चांदीचे दर उतरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोने आणि चांदीच्या किंमती वाढतच आहेत. जाणकारांच्या मते यावर्षी सोन्याच्या किंमती सर्वोच्च स्तरावर जाणार आहेत.
काय आहेत सोन्याचे शुक्रवारचे भाव? (Gold Price on 24 July 2020)
शुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारातील सोन्याचे भाव प्रति तोळा 475 रुपयांनी वाढले आहेत. यानंतर सोन्याचे दर 51,946 रुपये प्रति तोळा या रेकॉर्ड स्तरावर पोहोचले आहेत. याआधी सोन्याचे दर 51,471 रुपये प्रति तोळा होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 1,897 डॉलर प्रति औंस वर पोहोचले आहेत. याठिकाणी देखील सोन्याचे भाव उच्चतम स्तरावर आहेत.
(हे वाचा-मोबाइलच्या एका क्लिकवर मागवू शकाल किराणा; JioMartचे अॅप लाँच!)
काय आहेत चांदीचे शुक्रवारचे भाव? (Silver Price on 24 July 2020)
चांदीमध्ये शुक्रवारी 109 रुपये प्रति किलोची घसरण झाली आहे. त्यानंतर चांदीचे भाव 62,262 रुपये प्रति किलो झाले आहेत. याआधी चांदीचे भाव 62,371 रुपये प्रति किलोग्राम झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे भाव 22.70 डॉलर प्रति औंस वर पोहोचले आहेत.
का वाढत आहेत सोन्याचांदीचे भाव?
एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य 8 पैशांनी तमी झाले आहे. ज्यानंतर हे 74.83 च्या स्तरावर पोहोचले आहे. डोमेस्टिक इक्विटी सेंटीमेंट आणि अमेरिका व चीनमध्ये वाढणारा तणाव यामुळे गुंतवणूकदार खूप सतर्क आहेत. त्याचप्रमाणे जगभरातील कोरोनाच्या प्रकरणांमध्ये देखील वाढ होत आहे. परिणामी सुरक्षित गुंतवणुकीकडे त्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे मौल्यवान धातूच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत.