जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / मोबाइलच्या एका क्लिकवर मागवू शकाल किराणा; गुगल प्ले स्टोअर, iOS अ‍ॅप स्टोअरसाठी JioMart अ‍ॅप लाँच

मोबाइलच्या एका क्लिकवर मागवू शकाल किराणा; गुगल प्ले स्टोअर, iOS अ‍ॅप स्टोअरसाठी JioMart अ‍ॅप लाँच

मोबाइलच्या एका क्लिकवर मागवू शकाल किराणा; गुगल प्ले स्टोअर, iOS अ‍ॅप स्टोअरसाठी JioMart अ‍ॅप लाँच

रिलायन्सचे ग्राहकांसाठी असणारा ऑनलाइन किराणा प्लॅटफॉर्म ‘जिओ मार्ट’ (JioMart) उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान आता हे जिओमार्टचे App देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 जुलै : रिलायन्स ग्राहकांसाठी असणारा ऑनलाइन किराणा प्लॅटफॉर्म ‘जिओ मार्ट’ (JioMart) उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान आता हे जिओमार्टचे App देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. लाँचच्या काही दिवसातच हे अ‍ॅप आतापर्यंत 10 लाख युजर्सनी डाऊनलोड केले आहे. गुगल प्ले स्टोअरवरील शॉपिंग कॅटेगरीतील टॉप 3 पैकी ‘जिओमार्ट’ एक App बनले आहे. रिलायन्स समूहाने हे पाऊल उचलल्यामुळे आता या माध्यमातून ग्राहकांशी मोठ्या प्रमाणात जोडले जाणे शक्य होणार आहे. देशात एकूण 200 ठिकाणी होणार जिओमार्ट डिलिव्हरी अँड्रॉइड आणि iOS डिव्हाइस वापरणाऱ्या मोबाइल जनरेशनसाठी हे अ‍ॅप डिझाइन करण्यात आले आहे. याद्वारे ऑर्डर प्लेस करण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे. याआधी जिओमार्टची वेबसाइट लाँच करण्यात आली होती, दरम्यान ग्राहकांच्या सोयीसाठी आता App देखील लाँच करण्यात आले आहे. आता ग्राहकांना त्यांच्या मोबाइलवर एका क्लिकवरून किराणा आणि इतर काही महत्त्वाते प्रोडक्ट्स ऑर्डर करता येतील. देशभरातील 200 ठिकाणी जिओमार्टची डिलिव्हरी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी अ‍ॅप लाँच मार्केटमध्ये सध्या जिओमार्टची स्पर्धा Amazon आणि Flipkart शी आहे. रिलायन्सच्या व्हर्च्यूअल एजीएमनंतर आठवडाभरातच जिओमार्टचे अ‍ॅप लाँच करण्यात आले आहे. यासंदर्भात आरआयएलचे (RIL)चे चेअरमन मुकेश अंबानी यांनी देखील एजीएममध्ये भाष्य केले होते. दरम्यान मुकेश अंबानी यांनी घोषणा केली होती की, ग्राहकांच्या सोयीसाठी जिओमार्ट WhatApp बरोबर काम करेल. जेणेकरून लोकांना सोप्या पद्धतीने विविधं उत्पादनं खरेदी करता येतील. स्थानिक किराणा दुकाने आणि ग्राहकांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही प्लॅटफॉर्म काम करतील अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात