मराठी बातम्या /बातम्या /मनी /

RD Interest rate : रिकरिंग डिपॉझिटवरील व्याज दर मोजण्यासाठी वापरा `हे` सूत्र

RD Interest rate : रिकरिंग डिपॉझिटवरील व्याज दर मोजण्यासाठी वापरा `हे` सूत्र

आरडीमध्ये बचत केलेली रक्कम, कालावधी आणि निवडलेली योजना यांसारखे घटक विचार घेऊन व्याज मोजलं जातं. आरडी कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला बचतीची रक्कम, व्याज दर आणि कालावधी यांचं गणित या सूत्रानुसार मांडावं लागतं.

आरडीमध्ये बचत केलेली रक्कम, कालावधी आणि निवडलेली योजना यांसारखे घटक विचार घेऊन व्याज मोजलं जातं. आरडी कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला बचतीची रक्कम, व्याज दर आणि कालावधी यांचं गणित या सूत्रानुसार मांडावं लागतं.

आरडीमध्ये बचत केलेली रक्कम, कालावधी आणि निवडलेली योजना यांसारखे घटक विचार घेऊन व्याज मोजलं जातं. आरडी कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला बचतीची रक्कम, व्याज दर आणि कालावधी यांचं गणित या सूत्रानुसार मांडावं लागतं.

मुंबई, 30 नोव्हेंबर : कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूक (Investment) किंवा बचतीचा (Saving) मूळ उद्देश हा योग्य परतावा किंवा रिटर्न्स (Returns) असतो. आजच्या काळात आर्थिक नियोजनास अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहुतांश लोक हे नियोजन करताना सर्वसाधारणपणे शॉर्ट टर्म (Short term) आणि लाँग टर्म (Long Term) गोल्स गृहीत धरतात. मार्केटमध्ये गुंतवणूक किंवा बचतीचे अनेक मार्ग उपलब्ध असले तरी सुरक्षित आणि योग्य रिटर्न्स देणाऱ्या योजनांना प्राधान्य दिलं जातं. खासगी, सहकारी आणि सरकारी बॅंका तसेच अनेक वित्तीय संस्था नागरिकांसाठी बचतीकरिता नवनव्या योजना सातत्यानं लॉंच करत असतात. सध्याच्या काळात रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) आणि फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) हे बचतीचे प्रमुख आणि सुरक्षित मार्ग मानले जातात. बॅंका तसेच वित्तीय संस्थांमध्ये ही सुविधा नागरिकांकरिता उपलब्ध असते. मार्केटमध्ये म्युचअल फंडसह अन्य आकर्षक बचत योजना असल्या तरी त्यात जोखीम अधिक असू शकते. त्यामुळे नागरिकांचा आरडी (RD) किंवा एफडीकडं (FD) कल अधिक असतो.

आज देशातील जवळपास सर्वच वित्तीय संस्थांमध्ये आरडी सुविधा उपलब्ध आहे. आरडी हा लहान गुंतवणूकदारासाठी एक सर्वोत्तम पर्याय मानला जातो. यात ठराविक कालावधीसाठी निश्चित रकमेची बचत करता येते. त्यातून रक्कम आणि बॅंकेच्या योजनेनुसार तुम्हाला व्याज मिळतं. यात ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50 टक्के अधिक व्याज दर दिला जातो.

Multibagger Stock : 8.86 रुपयांचा शेअर 886 रुपयांवर; 1 लाख बनले 1 कोटी

तुम्ही जर अर्थिक नियोजनावेळी `आरडी`चा विचार करत असाल तर तुमच्या मनात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे व्याज दर (Interest Rate). नियोजन करताना तुमचं उदिदष्ट ठरलेलं असतं. उद्दिष्यपूर्तीसाठी आवश्यक रक्कम, बचत आणि आरडीचा व्याजदर याचा मेळ नेमका कसा बसवायचा याविषयी मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र हा संभ्रम टाळण्यासाठी तुम्ही बॅंका, वित्तीय संस्थांच्या आरडी योजना, चालू व्याज दर याविषयी माहिती घेऊ शकता. तसेच तज्ज्ञांचाही सल्ला घेऊ शकता. या व्यतरिक्त अजून 2 मार्ग आहेत, की जे तुम्हाला बचतीचा कालावधी, रक्कम आणि मॅच्युरिटीवेळी मिळणारे रिटर्न्स याची माहिती देतात. त्यात पहिला मार्ग असतो तो म्हणजे आरडी कॅल्क्युलेटरचा (RD Calculator). आज प्रत्येक बॅंकेच्या किंवा वित्तीय संस्थेच्या वेबसाइटवर ऑनलाइन आरडी कॅल्क्युलेटर उपलब्ध आहे. तुम्ही ऑनलाइन पध्दतीनं क्षणार्धात एकूण रकमेचा आढावा घेऊ शकता. दुसरा मार्ग म्हणजे आरडी कॅल्क्युलेट करण्याचा गणितीय फॉर्म्युला (Formula). या फॉर्म्युलाविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया...

बचतीतून मिळणारे रिटर्न्स नेमके किती असू शकतात, हे जाणून घेण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. अर्थात त्यावर संबंधित व्यक्तीचं आर्थिक नियोजन अवलंबून असतं. यासाठी आरडी कॅल्क्युलेट करण्याकरिता एक सूत्र उपलब्ध आहे. या अत्यंत सोप्या माध्यमातून तुम्ही मॅच्युरिटीवेळी मिळणाऱ्या रकमेचा अंदाज नक्की घेऊ शकता. आरडीमध्ये बचत केलेली रक्कम, कालावधी आणि निवडलेली योजना यांसारखे घटक विचार घेऊन व्याज मोजलं जातं. आरडी कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला बचतीची रक्कम, व्याज दर आणि कालावधी यांचं गणित या सूत्रानुसार मांडावं लागतं.

M=R((1+i)n-1)/1-(1+i)-1/3 हे आरडी कॅल्क्युलेट करण्याचं सूत्र आहे.

यात, M म्हणजे मॅच्युरिटी मूल्य

R म्हणजे महिन्याच्या बचतीचा हप्ता

n म्हणजे क्वार्टर्सची संख्या

i म्हणजे व्याज दर/400

उद्या 1 डिसेंबरपासून होणार 'हे' पाच बदल; काय होतील परिणाम?

आरडी मॅच्युरिटीवेळी तुम्हाला किती रक्कम मिळू शकेल याचा अंदाज घेण्यासाठी तुम्ही हे सूत्र मॅन्युअली वापरून गणित करू शकता, किंवा तुम्हाला हाच पर्याय संबंधित बॅंकेच्या वेबसाइटवरील कॅल्क्युलेटवरही उपलब्ध असतो. ऑनलाइन कॅल्क्युलेटर हे निःशुल्क, तत्काळ आकडेवारी दर्शवणारी सेवा असते. तुम्ही तुमची आकडेवारी त्यात भरल्यानंतर तुम्हाला तत्काळ व्याज दर आणि रकमेचा अंदाज येतो. याशिवाय तुम्ही विविध बॅंकाकडून दिल्या जाणाऱ्या व्याज दराची तुलना करून किफायतशीर योजनेची निवड या सूत्राच्या मदतीनं करू शकता. रिकरिंग डिपॉझिटमध्ये चक्रवाढ व्याजाची गणना करण्यासाठी तिमाहीच्या सुरुवातीची रक्कम विचारात घेतली जाते. जर तुम्ही एका तिमाहीदरम्यान आरडी बचत सुरू केली असेल तर नवीन तिमाही सुरू होईपर्यंत साधं व्याज मोजलं जातं. आणि नवीन तिमाही पासून चक्रवाढ व्याज मोजलं जातं. त्यामुळे संबंधित व्यक्तीला मॅन्युअली सूत्रानुसार गणित करताना दिसत असलेली रक्कम आणि प्रत्यक्ष मॅच्युरिटीवेळी मिळू शकणारी रक्कम यात थोडाफार फरक असू शकतो.

एक बाटली आणि चौघांचा बळी; सुसाट कारने 100 फूट हवेत उडवलं, थरारक घटनेचा VIDEO

हे सूत्र किंवा ऑनलाइन कॅल्क्युलेटरचा वापर करून तुम्ही आरडी बचतीच्या माध्यमातून अपेक्षित रिटर्न्स किती असेल, याचा अंदाज अगदी सहजपणे घेऊ शकता. रिकरिंग डिपॉझिटवर मिळणारे व्याज हे करपात्र (Taxable) असल्यानं ते तुमच्या उत्पन्नाशी जोडलं जातं. तुम्ही ज्या स्लॅबमध्ये आहात त्यानुसार तुम्हाला यावर कर भरावा लागतो. त्यामुळे आरडीच्या व्याज दरानुसार कॅल्क्युलेटरचा वापर करताना याचाही अंदाज तुम्हाला मिळू शकतो. अर्थात यामुळे त्यानुसार नियोजन करणंही शक्य होतं. ज्येष्ठ नागरिक देखील या कॅल्क्युलेटरचा वापर करून रिटर्न्सबाबतची प्राथमिक आणि अंदाजे माहिती अगदी सहजपणे घेऊ शकतात.

आजच्या काळात आरडीमध्ये गुंतवणूक करणं किंवा बचत करणं हे सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे आर्थिक नियोजन करताना आरडीची योग्य योजना, मिळणारा व्याज दर आणि रिटर्न्स या गोष्टींची तपशील मांडताना ऑनलाइन आरडी कॅल्क्युलेटर किंवा मॅन्युअली गणित करण्यासाठी सूत्र हे दोन्ही पर्याय निश्चितच फायदेशीर ठरतील यात शंकाच नाही.

First published:

Tags: Investment, Money