जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Digital Currency च्या दिशेन RBI ची वाटचाल, तुम्हाला घेता येणार की नाही वाचा सविस्तर

Digital Currency च्या दिशेन RBI ची वाटचाल, तुम्हाला घेता येणार की नाही वाचा सविस्तर

Digital Currency च्या दिशेन RBI ची वाटचाल, तुम्हाला घेता येणार की नाही वाचा सविस्तर

भारतात लवकरच Digital Currency, तुम्हाला वापरता येणार की नाही, RBI नं दिलं उत्तर

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : क्रेप्टोकरन्सी सारखंच भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच आरबीआय डिजिटल करन्सी आणण्याच्या तयारीत आहे. ई रुपयाबाबत लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. याबाबत सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. RBI ने कॉन्सेप्ट नोट जारी करून ई नोट कशी असेल याबाबत माहिती दिली आहे. Central Bank Digital Currency दोन वेगवेगळ्या स्वरुपात असणार आहेत. रिटेल ई रुपया आणि होलसेल ई रुपया असे दोन प्रकार यामध्ये असणार आहेत. कोणाला गुंतवणूक करता येणार? रिटेल ई रुपया हा सर्वांसाठी असणार आहे. यामध्ये कोणीही गुंतवणूक करू शकतं किंवा ते पैसे घेऊन वापरू शकतं. होलसेल ई रुपयासाठी मात्र काही अटी आणि नियम असणार आहेत. निवडक वित्तीय संस्थांसाठी होलसेल ई-रुपी उपलब्ध असेल. ई-रुपी डायरेक्ट मॉडेल आणि अप्रत्यक्ष मॉडेलमध्ये असेल. थेट मॉडेल ई रुपया थेट रिझर्व्ह बँकेद्वारे जारी केला जाईल. बँक अप्रत्यक्ष मॉडेलसह ई-रुपीमध्ये देखील सहभागी होईल. ई-रुपया टोकन स्वरूपात असेल. केप्टोकरन्सी किंवा बिटकॉईनला स्पर्धा करणारं हे ई रुपया असणार आहे. हिशेबासाठी ई-रुपी देखील वेगळा असेल.

हा स्टॉक निघाला कुबेराचा खजाना! तुम्ही घेतला नसेल तर कराल पश्चाताप, वाचा कारण

क्रॉस बॉर्डर पेमेंटसाठी डिजिटल करन्सी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अमेरिकन फिनटेक कंपनी एफआयएसशी चर्चा सुरू आहे. भारतीय रिझर्व्ह बँक काही काळ या ई रुपयाचे फायदे आणि तोटे दोन्हीचा अभ्यास करेल. डिजिटल करन्सी सुरू करण्यापूर्वी, चार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) साठी पॉयलट प्रोजेक्ट सुरू करायला सांगितला आहे. का महत्त्वाची डिजिटल करन्सी लोकांना आपल्याजवळ पैसे ठेवण्याची गरज यामुळे पडणार नाही. हे मोबाईल वॉलेट किंवा ऑनलाइन पेमेंटसारखं काम करेल अशी माहिती दिली आहे. डिजिटल करन्सीला तुम्ही तुमच्या फोनमधील पेमेंट App वरही ठेवू शकता.

PM KISAN लाभार्थ्यांसाठी खुशखबर! सरकार करणार आर्थिक शेतकऱ्यांना मदत, पाहा कशी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येत्या आर्थिक वर्षात RBI द्वारे डिजिटल करन्सी किंवा सेंट्रल बँक डिजिटल करन्सी जारी करण्याची घोषणा केली होती. त्याच वेळी, सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक डिजिटल करन्सी कशा प्रकारे वापरता येईल यावर सध्या काम चालू आहे असंही अर्थमंत्र्यांनी FICCI च्या एका कार्यक्रमात सांगितलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात