मराठी बातम्या /बातम्या /मनी /

हा स्टॉक निघाला कुबेराचा खजाना! तुम्ही घेतला नसेल तर कराल पश्चाताप, वाचा कारण

हा स्टॉक निघाला कुबेराचा खजाना! तुम्ही घेतला नसेल तर कराल पश्चाताप, वाचा कारण

मार्केटमध्ये असे अनेक मल्टिबॅगर स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी कालावधीत मोठी कमाई करुन दिली.

मार्केटमध्ये असे अनेक मल्टिबॅगर स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी कालावधीत मोठी कमाई करुन दिली.

मार्केटमध्ये असे अनेक मल्टिबॅगर स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी कालावधीत मोठी कमाई करुन दिली.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : शेअर बाजारातील अनेक स्टॉक्सने गुंतवणूकदारांना मोठे रिटर्न दिले आहेत. मार्केटमध्ये असे अनेक मल्टिबॅगर स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी कालावधीत मोठी कमाई करुन दिली.

पेज इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर यापैकीच एक आहे. हा शेअर गुंतवणुकदारांसाठी मल्टिबॅगर स्टॉक्स असल्याचं सिद्ध झालं आहे. या शेअर्सन 15 वर्षांत 19,900 टक्के एवढा जबरदस्त रिटर्न दिला.

पेज इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर आता 2 टक्क्यांनी वाढला असून तो 54,000 च्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला. गेल्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर सतत वाढत आहे.

पेज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी इनरवेअर उत्पादन आणि किरकोळ विक्रीचे काम करते. भारत, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, ओमान, कतार, मालदीव, भूतान आणि संयुक्त अरब अमिरातीमधील जॉकी इंटरनॅशनलचे एक्सक्लुझिव्ह लायसन्स या कंपनीकडे आहे. भारतातील स्पीडो ब्रँडचे उत्पादन, मार्केटिंग आणि डिस्ट्रिब्युशनचं कामही याच कंपनीकडे आहे.

महामारीच्या काळात 'ही' योजना भारतासाठी बूस्टर, वर्ल्ड बँकेनंही केलं कौतुक

2007 मध्ये झालं होतं शेअर लिस्टिंग

पेज इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स मार्च 2007 मध्ये लिस्ट झाले होते. त्यावेळी या कंपनीच्या एका शेअरची किंमत 270 रुपये होती. परंतु 15 वर्षांत त्याची किंमत 19,900 टक्क्यांनी वाढली आहे. सध्या या कंपनीच्या एका शेअरची किंमत 54000 आहे. पेज इंडस्ट्रीजचा शेअर हा या वर्षात म्हणजेच 2022 मध्ये आतापर्यंत सुमारे 31 टक्क्यांनी वाढला आहे.

सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत या कंपनीनं 207 कोटींचा नफा मिळवला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत फक्त 10.9 कोटी होता. म्हणजेच कंपनीच्या नफ्यातसुद्धा अनेक पटींनी वाढ झाली आहे.

त्याच वेळी, याच काळात कंपनीच्या कामकाजातून मिळालेला महसूल 1,341 कोटी होता. जो मागील आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत मिळालेल्या महसुलापेक्षा दुप्पट जास्त आहे.

फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा लाखो रुपयांचे रिटर्न

शेअरच्या किंमत वाढीचा कल कायम राहिल?

तज्ज्ञांच्या मते, सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्ष 2022- 23 च्या पहिल्या तिमाहीत पेज इंडस्ट्रीजची टॉपलाइन स्ट्रीट अंदाजांसाठी चांगली ठरली. कारण कंपनीच्या महसुलात जोरदार वाढ झाली होती.

कॉटन आणि पॅकिंग मटेरियलमध्ये महागाई वाढल्याने कंपनीचे एकूण मार्जिन अपेक्षेपेक्षा कमी होते. पोर्टफोलिओमधील वाढ आणि डिस्ट्रिब्युशन विस्तारामुळे कंपनीच्या सर्व उत्पादन श्रेणींमध्ये विक्रीत वाढ झाली.

व्ही.एस.गणेश म्हणतात...

तर, ओझ इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक व्ही.एस.गणेश म्हणाले, ‘आम्ही बाजारातील सध्याची परिस्थिती पाहून आमच्या उत्पादनांकडे सकारात्मक दृष्टिकोनाकडून पाहत आहोत.

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर किसान योजनेचे पैसे कोणाला मिळणार?

क्लालिटी, किंमत, प्रॉडक्ट डिझाइन आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या आमच्या या भक्कम आधारस्तंभांवर आधारित, आम्ही आमच्या ग्राहकांना प्रीमिअम उत्पादनांची विस्तृत श्रेणी देत राहू. मुलांसाठी आणि महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह इनरवेअर लाँच करण्याची आमची रणनीती खूप यशस्वी ठरली.’

शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवण्याची इच्छा अनेकांची असते. मात्र योग्य स्टॉक निवडणे मोठं कठीण काम आहे. मात्र, एखादा शेअर हा गुंतवणूकदारांना कमी वेळात सुद्धा मालामाल करून जातो.

First published:

Tags: Money, Share market, Stock Markets