जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PM KISAN लाभार्थ्यांसाठी खुशखबर! सरकार करणार आर्थिक शेतकऱ्यांना मदत, पाहा कशी

PM KISAN लाभार्थ्यांसाठी खुशखबर! सरकार करणार आर्थिक शेतकऱ्यांना मदत, पाहा कशी

PM KISAN लाभार्थ्यांसाठी खुशखबर! सरकार करणार आर्थिक शेतकऱ्यांना मदत, पाहा कशी

PM KISAN लाभार्थ्यांसाठी खुशखबर! आणखी एका योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या रकमेच्या 12 व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. 12 व्या हप्त्यातील 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यापूर्वी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) ची सुविधा जाहीर केली. जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कमी व्याजावर कर्ज घेणं आणखी सोपं होणार आहे. शेतकऱ्याला कसा होणार फायदा कर्जावर लावण्यात आलेल्या जास्त व्याजापासून शेतकऱ्याची सुटका होईल. शेतकऱ्याला दिवाळीआधी पंतप्रधान मोदी सरकारने दिलेलं आणखी एक मोठं गिफ्टच म्हणावं लागेल. क्रेडिट कार्डच्या मदतीने शेतकरी कोणताही रोजगार सुरू करू शकतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार अशा योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर किसान योजनेचे पैसे कोणाला मिळणार?

किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरात कर्ज देतं. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांव्यतिरिक्त, जे शेतकरी पात्र आहेत त्यांनाच त्याचा लाभ मिळतो. किसान क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही तुमच्या पिकाशी संबंधित खर्चही काढू शकता. तुम्ही बियाणे, खते, यंत्रे इत्यादी गोष्टींसाठी पैसे गुंतवू शकता. तुम्हाला किती कर्ज मिळते? किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज दिले जाते. या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अंतर्गत 1.60 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय उपलब्ध आहे. त्याचबरोबर या योजनेतून शेतकरी 3 वर्षात 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. सरकारकडून व्याजदरात 2 टक्के सूटही आहे. अशा परिस्थितीत 9 टक्क्यांऐवजी केवळ 7 टक्के व्याज द्यावे लागेल.

फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा लाखो रुपयांचे रिटर्न

कसं करायचं अप्लाय? तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकता. तुम्हाला बँकेत एक फॉर्म भरावा लागेल. यासोबतच योजनेशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रेही तेथे सादर करावी लागणार आहेत. किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि 2 पासपोर्ट आकाराची छायाचित्रे आवश्यक असतील. फॉर्म भरल्यानंतर बँक तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करेल. त्यानंतर तुम्हाला कर्ज मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात