मराठी बातम्या /बातम्या /मनी /RBI कडून 'या' बँकेचा परवाना सस्पेंड, तुमचंही बँकेत खातं असेल तर काय परिणाम होईल?

RBI कडून 'या' बँकेचा परवाना सस्पेंड, तुमचंही बँकेत खातं असेल तर काय परिणाम होईल?

बँकेकडे पुरेसे भांडवल नाही आणि कमाईची क्षमता नाही, असे निवेदनात म्हटले आहे. मिल्लथ को-ऑपरेटिव्ह बँक लि. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 56 च्या तरतुदींचे पालन करण्यात अयशस्वी ठरली आहे.

मुंबई, 19 जून : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने कर्नाटकातील दावणगेरे येथील मिल्लथ को-ऑपरेटिव्ह बँक लि. दावणगेरेचा (Millath Co-operative Bank Ltd., Davangere) परवाना सस्पेंड केला आहे. रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले आहे. कारण या सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नाही आणि ती सध्याच्या ठेवीदारांना पूर्ण रक्कम परत करण्याच्या स्थितीत नाही.

रिझर्व्ह बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, शनिवार, 18 जून 2022 रोजी बँक बँकिंग व्यवसाय करू शकणार नाही. सहकारी संस्थांचे निबंधक, कर्नाटक यांना देखील विनंती करण्यात आली आहे की त्यांनी बँक बंद करण्याचा आदेश जारी करावा आणि बँकेसाठी लिक्विडेटरची नियुक्ती करावी. याबाबत RBI ने एका प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

बँकेकडे पुरेसे भांडवल नाही आणि कमाईची क्षमता नाही, असे निवेदनात म्हटले आहे. मिल्लथ को-ऑपरेटिव्ह बँक लि. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 56 च्या तरतुदींचे पालन करण्यात अयशस्वी ठरली आहे.

मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी 'या' योजनेत करा गुंतवणूक; शिक्षण, लग्न खर्चाची चिंता राहणार नाही

बँकेचा परवाना निलंबित करण्याची घोषणा करताना, रिझर्व्ह बँकेने सांगितले की, बँकेने सादर केलेल्या तपशीलानुसार, ठेवीदारांना त्यांची संपूर्ण ठेव रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) मार्फत मिळेल. लिक्विडेटरची नियुक्ती झाल्यास प्रत्येक ठेवीदाराला DICGC कडून ठेव विम्याचा दावा करण्याचा अधिकार आहे. त्याची मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत आहे.

सरकारी स्कीमधून मिळणार 15000 रुपये आणि नोकरी, तुम्हालाही आलाय का मेसेज?

बँकेला बँकिंग व्यवसाय पुढे चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक हितावर विपरित परिणाम होईल, असे आरबीआयने म्हटले आहे. 18 मे 2022 पर्यंत, DICGC ने बँकेच्या संबंधित ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या विनंतीच्या आधारे DICGC कायदा, 1961 च्या कलम 18A च्या तरतुदींनुसार एकूण ठेवींपैकी 10.38 कोटी रुपये भरले आहेत.

First published:
top videos

    Tags: Bank details, Money, Rbi