Home /News /money /

मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी 'या' योजनेत करा गुंतवणूक; शिक्षण, लग्न खर्चाची चिंता राहणार नाही

मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी 'या' योजनेत करा गुंतवणूक; शिक्षण, लग्न खर्चाची चिंता राहणार नाही

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी तुम्हाला प्रथम पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडण्याचा फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मसोबत मुलीचा जन्म दाखला, फोटो अशी संबंधित कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

    मुंबई, 19 जून : चांगल्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन अनेकांकडून केलं जातं. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीसाठी असाच विचार केला असेल. प्रत्येक पालकांना आपल्या मुलीच्या लग्नासोबतच तिच्या चांगल्या शिक्षणाची चिंता असते. तुमच्या या चिंतेवर मात करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojna). केंद्र सरकारची (Central Government Scheme) ही अल्प बचत योजना आहे. त्याची खाती पोस्ट ऑफिस (Post Office) किंवा व्यावसायिक बँकांमध्ये उघडता येतात. तुम्ही हे खाते SBI या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक मध्ये देखील उघडू शकता. सध्या, सुकन्या समृद्धी योजना खात्यावर 7.6 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे. सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारच्या 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' मोहिमेचा एक भाग आहे. या योजनेंतर्गत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी हे खाते उघडता येते. पालकांच्या वतीने कायदेशीर पालक खाते उघडत असल्यास, त्यांना ओळखपत्र आणि पत्ता पुरावा द्यावा लागेल. त्यासाठी पॅनकार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशनकार्ड आदी कागदपत्रे जमा करता येतील. यासोबतच मुलगी आणि पालकांची छायाचित्रेही सादर करावी लागणार आहेत. 5G सेवा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरु होणार, दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांचे संकेत खाते कसे उघडायचे? सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी (How to open Sukanya Samriddhi Yojna Account) , तुम्हाला प्रथम पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडण्याचा फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मसोबत मुलीचा जन्म दाखला, फोटो अशी संबंधित कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. तुम्हाला फॉर्मसोबत किमान 250 रुपये रोख जमा करावे लागतील. मात्र एकदा खाते उघडल्यानंतर, आपण रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे पैसे जमा करू शकता. उच्च व्याज दर सुकन्या समृद्धी योजना खात्यावर उच्च व्याजदर दिला जातो. या खात्यात तुम्ही वार्षिक किमान 250 रुपये जमा करू शकता. तुमच्या सोयीनुसार तुम्ही वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करू शकता. 31 मार्च 2022 च्या तिमाहीवर आधारित व्याजदर सध्या 7.6 टक्के आहे. ही रक्कम पहिल्या 14 वर्षांसाठी खात्यात जमा करावी लागेल. ही योजना 21 वर्षांनी मॅच्युअर होते. मुलीचे वय 18 वर्ष झाल्यानंतर लग्न झाल्यास रक्कम काढता येते. याशिवाय वयाच्या 18 वर्षांनंतर तुम्ही मुलीच्या शिक्षणासाठी 50 टक्के रक्कम काढू शकता. Post Office मध्ये गुंतवणुकीचे पर्याय, पैसे सुरक्षित राहतील आणि बँकेहून अधिक परतावा मिळेल कर लाभ सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते उघडल्यास, तुम्हाला आयकर कायदा 1961 च्या कलम 80सी अंतर्गत दीड लाख रुपयांचा आयकर लाभही मिळतो. एवढेच नाही तर रिटर्न आणि मॅच्युरिटी रकमेला करातून सूट देण्यात आली आहे. याचा अर्थ तुम्हाला करमुक्त परतावा मिळतो.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Central government, Investment, Money

    पुढील बातम्या