जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सरकारी स्कीमधून मिळणार 15000 रुपये आणि नोकरी, तुम्हालाही आलाय का मेसेज?

सरकारी स्कीमधून मिळणार 15000 रुपये आणि नोकरी, तुम्हालाही आलाय का मेसेज?

सरकारी स्कीमधून मिळणार 15000 रुपये आणि नोकरी, तुम्हालाही आलाय का मेसेज?

पीएम वाणी (PM Wani Scheme) या सरकारी योजनेबाबत (Government Scheme) अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत. या योजनेचं तथ्य जाणून घेण्यासाठी PIBने तपासणी केली आहे. एबीपी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 जून : सोशल मीडियावर (Social Media) कधी काय व्हायरल होईल याचं काही सांगता येत नाही. मात्र अनेकदा त्याचा त्रास सर्वसामन्यांना सहन करावा लागलो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक पोस्टमध्ये सरकारी योजनेत पैसे देण्याचा दावा केला जातो. अशीच एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पीएम वाणी (PM Wani Scheme) या सरकारी योजनेबाबत (Government Scheme) अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत. या योजनेचं तथ्य जाणून घेण्यासाठी PIBने तपासणी केली आहे. एबीपी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे. पीआयबीने आपल्या अधिकृत ट्वीटमध्ये लिहिले आहे की, बनावट पत्राद्वारे पीएम-वाणी योजनेअंतर्गत वाय-फाय पॅनल, 15,000 भाडे आणि 650 फीच्या बदल्यात नोकरी देण्याचे आश्वासन दिले जात आहे. दूरसंचार विभागाकडून अशा कोणत्याही देयकाची मागणी केली जात नाही. मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी ‘या’ योजनेत करा गुंतवणूक; शिक्षण, लग्न खर्चाची चिंता राहणार नाही

जाहिरात

खोटे व्हिडीओ शेअर करू नका फॅक्ट चेकनंतर पीआयबीने हा मेसेज पूर्णपणे बनावट असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा मेसेजपासून प्रत्येकाने सावध राहावे, असे पीआयबीने म्हटले आहे. PIB ने लोकांना असे मेसेज फॉरवर्ड न करण्यास सांगितले आहे. अशा मेसेजद्वारे दिशाभूल करून, तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती आणि पैसा धोक्यात आणता. 5G सेवा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरु होणार, दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांचे संकेत असा कोणताही मेसेज तुमच्यापर्यंत आल्यास, तुम्ही त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी फॅक्ट चेक करू शकता. तुम्ही PIB द्वारे तथ्य तपासणी करू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर व्हिडीओ पाठवू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात