मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /India Toy Fair: भारतीय खेळण्यांचा पहिला उत्सव 27 फेब्रुवारीपासून, डिजिटल प्रदर्शन आणि बरंच काही असणार

India Toy Fair: भारतीय खेळण्यांचा पहिला उत्सव 27 फेब्रुवारीपासून, डिजिटल प्रदर्शन आणि बरंच काही असणार

इंडिया टॉय फेअर (India Toy Fair) अर्थात भारतीय खेळण्यांचा (Indian Toys) उत्सव 27 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. हा व्हर्च्युअल फेअर असेल अर्थात ऑनलाइन स्वरूपाचं प्रदर्शन यामध्ये असेल.

इंडिया टॉय फेअर (India Toy Fair) अर्थात भारतीय खेळण्यांचा (Indian Toys) उत्सव 27 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. हा व्हर्च्युअल फेअर असेल अर्थात ऑनलाइन स्वरूपाचं प्रदर्शन यामध्ये असेल.

इंडिया टॉय फेअर (India Toy Fair) अर्थात भारतीय खेळण्यांचा (Indian Toys) उत्सव 27 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. हा व्हर्च्युअल फेअर असेल अर्थात ऑनलाइन स्वरूपाचं प्रदर्शन यामध्ये असेल.

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी: इंडिया टॉय फेअर (India Toy Fair) अर्थात भारतीय खेळण्यांचा (Indian Toys) उत्सव 27 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. अशा प्रकारचा भारतातला हा पहिलाच उत्सव असून, तो व्हर्च्युअल (Virtual) अर्थात आभासी माध्यमांद्वारे होणार आहे. दोन मार्च 2021पर्यंत हा उत्सव चालणार असून, या उत्सवाच्या वेबसाइटचं उद्घाटन 11 फेब्रुवारी रोजी तीन केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झालं होतं. या आभासी उत्सवात सहभागी होण्यासाठी मुलं, त्यांचे पालक, शिक्षक, प्रदर्शक आदींना या वेबसाइटवर नोंदणी करावी लागणार आहे. भारतीय खेळण्यांच्या विश्वाचं दर्शन हा उत्सव घडवणार आहे.

या पहिल्यावहिल्या डिजिटल प्रदर्शनात विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधून एक हजारांहून अधिक एक्झिबिटर्स (Exhibiitors) वेगवेगळ्या प्रकारची खेळणी ठेवणार आहेत. ती खेळणी विकत घेण्याची संधी सहभागी सदस्यांना मिळणार आहे. शिवाय भारतीय खेळण्यांच्या विश्वाचे वेगवेगळे पैलू उलगडणारे वेबिनार्स, चर्चासत्रं आणि कृतीसत्रं आदींमध्येही सहभागी होता येणार आहे.

कसं सहभागी होता येईल?

इंडिया टॉय फेअरच्या वेबसाइटच्या उद्घाटनावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी सांगितलं, की भारतात आयात केल्या जाणाऱ्या कमी दर्जाच्या स्वस्त खेळण्यांमुळे भारतीय खेळण्यांच्या उद्योगावर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी वर्षभरापूर्वी आल्या होत्या. त्यानंतर समितीने केलेल्या तपासणीत असं आढळलं, की आयात केलेल्या प्लास्टिकच्या खेळण्यांपैकी 30 टक्के खेळण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रसायनं आणि जड धातूंचा वापर करण्यात आला होता. हा वापर शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा किती तरी अधिक होता. अन्य खेळण्यांचा दर्जाही कमी होता. त्यामुळे खेळण्यांच्या दर्जा नियंत्रणाच्या मुद्द्याला चालना मिळाली. या पार्श्वभूमीवर, या उपक्रमामुळे भारतीयांना चांगली खेळण्यांची उपलब्धता होईल, असं गोयल यांनी स्पष्ट केलं.

शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Ramesh Pokhariyal Nishank) यांनी त्याच कार्यक्रमात आपले विचार मांडले होते. 'भारतीय खेळण्यांमुळे बालपण आनंदी बनतं. तसंच, खेळावर, शोधावर आणि कृतीवर आधारित शिक्षणामुळे अभ्यास आणि प्रात्यक्षिक यातलं अंतर भरून काढण्यास मदत होते. नव्या शैक्षणिक धोरणाचा भर यावर आहे,' असं ते म्हणाले.

'भारतीय खेळण्यांचा उद्योग हे अनेक कलाकार आणि लघुउद्योजकांच्या उपजीविकेचं साधन आहे. हा उत्सव यशस्वी होण्यासाठी सहा केंद्रीय मंत्रालयं एकत्र आली आहेत,' असं केंद्रीय वस्त्रोद्योग, तसंच महिला-बालविकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी सांगितलं.

'आत्मनिर्भर भारत (Atmanirbhar Bharat) मोहिमेअंतर्गत भारतीय खेळणी निर्मिती उद्योगाला मोठी चालना मिळण्यासाठी, तसंच 'व्होकल फॉर लोकल'द्वारे (Vocal for Local) खेळणी उद्योगात परिवर्तन घडवून आणण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे,' असं स्मृती इराणी यांनी नमूद केलं.

इंडिया टॉय फेअरची प्रमुख वैशिष्ट्यं -

- 1000हून अधिक स्टॉल्स असलेलं व्हर्च्युअल एक्झिबिशन

- विविध विषयांवर तज्ज्ञांच्या चर्चा, वेबिनार्स, परिसंवाद इत्यादी.

- विषय - खेळण्यांवर आधारित शिक्षण, क्राफ्ट प्रात्यक्षिके, स्पर्धा, प्रश्नमंजूषा, व्हर्च्युअल टूर्स, नव्या उत्पादनांचं सादरीकरण

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (National Education Policy) अनुषंगाने इंडिया टॉय फेअरमध्ये विशेष सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात खेळावर आधारित आणि कृतींवर आधारित शिक्षण, घरात आणि घराबाहेर खेळले जाणारे खेळ, विचारक्षमता वाढवण्यासाठी पझल्स आणि गेम्सचा उपयोग आणि एकंदरीतच शिकण्याची प्रक्रिया आनंददायी आणि गुंतवून ठेवणारी कशी होईल, या अनुषंगाने होणाऱ्या सत्रांचा समावेश आहे.

 अवश्य वाचा -  26 February ला भारत बंद; व्यापारांच्या संपामुळे देशभरातले बाजार राहणार बंद

लहानपण आनंदी करणाऱ्या आणि खेळण्यांतून शिकवणाऱ्या विविध उत्पादनांचं उत्पादन करणाऱ्या अनेक भारतीय कंपन्या, एनसीईआरटी, एससीईआरटी, सीबीएसई शाळा आणि शिक्षक, आयआयटी गांधीनगर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, अहमदाबादमधील चिल्ड्रेन युनिव्हर्सिटी आदी संस्था प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.

आता रिलायन्स रिटेलच्या मालकीची असलेली हॅमलेज (Hamleys) ही सर्वांत जुनी ब्रिटिश मल्टिनॅशनल कंपनी इंडिया टॉय फेअरची टाइल स्पॉन्सर आहे. ही कंपनी व्हर्च्युअल बूथही स्थापन करणार आहे. मुंबई, दिल्ली, अहमदाबादमध्ये ही कंपनी टॉय सर्कल्सही सुरू करणार आहे.

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा भाग म्हणून हॅम्लेजतर्फे अंगणवाडी सेविकांच्या मुलांसाठी टॉय किट्स आणि खेळणी दिली जाणार आहेत.  733 अंगणवाड्यांसाठी लाकडी खेळणी घेऊन ती त्यांना दिली जाणार आहेत.

First published:
top videos

    Tags: Digital services, Education, India, Smriti irani