advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / PNB ला 13 हजार कोटींचा गंडा घालणाऱ्या नीरव मोदीला एका बँक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे झाली अटक

PNB ला 13 हजार कोटींचा गंडा घालणाऱ्या नीरव मोदीला एका बँक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे झाली अटक

UK कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर अखेर कर्जबुडव्या हिरे व्यापारी नीरव मोदी भारताच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंजाब नॅशनल बँकेला (PNB) 13 हजार कोटींना फसवणाऱ्या नीरव मोदीचा गैरव्यवहार एका बँक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे उजेडात आला होता.

01
पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींना फसवणाऱ्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली. आता त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. नीरव मोदीला अटक झाली ती एक बँक कर्मचाऱ्याच्या समयसूचकतेमुळे.

02
नीरव मोदी लंडनमध्ये मेट्रो बँकेच्या एका कर्मचाऱ्यामुळे पकडला गेला. तो बँकेत खातं उघडायला गेला होता.

03
बँक कर्मचाऱ्यानं नीरव मोदीला ओळखलं. त्यानं स्काॅटलँड यार्डला कळवलं. तसे पोलीस ताबडतोब बँकेत पोचले. नीरवला पकडलं. त्याला जिथून पकडलं त्यावरून हे लक्षात येतं की तो वेस्ट एंडच्या सेंटर पाॅइंटमध्ये आलिशान अपार्टमेंटमध्ये रहात होता.

04
नीरव मोदीकडे तीन पासपोर्ट आहेत. भारतीय एजन्सींनी नीरव मोदीचे पासपोर्ट रद्द केले होते. नीरवचा एक पासपोर्ट मेट्रोपोलिटन पोलिसांकडे आहे. दुसरा ब्रिटनच्या गृहविभागाकडे आहे. तो आता संपलाय. आणि तिसरा पासपोर्ट ड्रायव्हिंग अँड व्हेइकल लायसेसिंगकडे आहे. ते तीनही पासपोर्ट ब्रिटनमध्येच आहेत.

05
नीरव मोदीकडे रेसिडन्सी कार्डही आहेत. सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात, हाँगकाँग या देशाची कार्ड त्याच्याकडे आहेत.

06
भारतीय बँकिंग क्षेत्रात 13 हजार कोटींचा घोटाळा केल्यानंतर नीरव मोदी दोन वर्षांपूर्वी भारतातून फरार झाला होता. त्यानंतर भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी विविध स्थरांवर प्रयत्न करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून इंटरपोलनं 2018च्या जुलै महिन्यांत नीरव मोदीच्या नावे रेड कॉर्नर नोटीसही जाहीर केली होती.

07
 नीरव मोदीला भारताच्या स्वाधीन करायला अखेर ब्रिटनच्या न्यायालयाने परवानगी दिली आहे. UK च्या न्यायालयाने (UK court orders extradiction Nirav modi)नीरव मोदीच्या याचिकेवर सुनावणी करताना भारत सरकारच्या बाजून निर्णय घेत त्याच्या प्रत्यार्पणाला होकार दिला आहे.

08
भारतातल्या बँकांचं हजारो कोटींचं कर्ज बुडवून नीरव मोदी फरार झाला होता. त्याच्यावर EDने देखील अनेक आर्थिक गुन्हे दाखल केले आहेत. आर्थिक गुन्ह्याचा आरोप असल्याने त्याची 329.66 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे. यात त्याची मुंबईची मालमत्ता, आलिशान फ्लॅट याचाही समावेश आहे.

09
प्रत्यार्पण केल्यानंतर नीरव मोदीची रवानगी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात केली जाणार आहे. PNB घोटाळा प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्याला आर्थर रोड तुरुंगात राहावं लागणार आहे. ब्रिटीश न्यायमूर्तींनी त्याबाबतही निर्णय दिला आहे. मुंबईच्या आर्थर रोड जेलमधलं कोठडी क्रमांक 12 नीरव मोदीसाठी योग्य असल्याचा निर्वाळा ब्रिटीश जजनी दिला आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींना फसवणाऱ्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली. आता त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. नीरव मोदीला अटक झाली ती एक बँक कर्मचाऱ्याच्या समयसूचकतेमुळे.

    MORE
    GALLERIES