Home /News /money /

मुंबईतील या बँकेवर RBI ने ठोठावला 79 लाखांचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

मुंबईतील या बँकेवर RBI ने ठोठावला 79 लाखांचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

एनपीए वर्गीकरणासह काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने अपना सहकारी (RBI Penalty on Apana sahakari Bank) बँकेवर 79 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

    नवी दिल्ली, 25 सप्टेंबर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India penalty on Bank in Mumbai) मुंबईतील बँकेवर दंड आकारला आहे. एनपीए वर्गीकरणासह काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने अपना सहकारी (RBI Penalty on Apana sahakari Bank) बँकेवर 79 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की बँकेच्या वैधानिक तपासणीत काही निर्देशांचे पालन न केल्याचे आढळून आले आहे. बँकेने एनपीए वर्गीकरण, मृत वैयक्तिक ठेवीदारांच्या चालू खात्यातील ठेवींवर व्याज भरताना किंवा दावे निकाली काढताना शिवाय बचत बँक खात्यांमध्ये किमान शिल्लक न राखल्याने दंडात्मक शुल्क आकारण्याच्या निर्देशांचे पालन केले नाही. अपना सहकारी बँकेची वैधानिक तपासणी 31 मार्च 2019 रोजी त्याच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात होती. वरील निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड का आकारला जाऊ नये याचे कारण विचारत बँकेला नोटीस बजावण्यात आली आहे. Gold Rate Today: 47 हजारांपेक्षा कमी झाला सोन्याचा भाव, काय आहेत लेटेस्ट किंमती? बँक ग्राहकांवर काय होणार परिणाम? रिझर्व्ह बँकेने सांगितले की, बँकेने नोटीसला दिलेले उत्तर, अतिरिक्त पूरक उत्तर आणि सुनावणी दरम्यान दिलेला तोंडी जबाब या बाबी विचारात घेतल्यानंतर दंड आकारण्यात आला. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, दंड नियामक अनुपालनाअभावी लावण्यात आला आहे आणि बँकेने त्याच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नव्हता. त्यामुळे ग्राहकांवर याचा थेट परिणाम होणार नाही. या तारखेपर्यंत मिळणार PM Kisan चा 10वा हप्ता, खात्यात येणार 2000 रुपये या बँकांवर देखील RBI ने ठोठावला दंड दुसऱ्या एका निवेदनात रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, कोलकातास्थित व्हिलेज फायनान्शियल सर्व्हिसेसवर KYC नियमांच्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अहमदनगर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेला 13 लाख रुपये, अहमदाबादच्या महिला विकास सहकारी बँकेला 2 लाख रुपये दंड ठोठावण्यात आल्याचेही केंद्रीय बँकेने म्हटले आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bank, Bank details

    पुढील बातम्या