Home /News /money /

Gold Rate Today: 47 हजारांपेक्षा कमी झाला सोन्याचा भाव, काय आहेत लेटेस्ट किंमती?

Gold Rate Today: 47 हजारांपेक्षा कमी झाला सोन्याचा भाव, काय आहेत लेटेस्ट किंमती?

Gold-Silver Price Today

Gold-Silver Price Today

सोन्याचांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढउतार कायम आहे. सोन्याचे दरामध्ये (Gold Price Today on 25 September) अधिकतर घसरणीचा कल आहे.

    नवी दिल्ली, 25 सप्टेंबर: सोन्याचांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढउतार कायम आहे. सोन्याचे दरामध्ये (Gold Price Today on 25 September) अधिकतर घसरणीचा कल आहे. आज सोन्याचे दर 47 हजारांपेक्षा कमी आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Rate on Multi Commodity Exchange) ऑक्टोबररच्या सोन्याची वायदे किंमत 46995 रुपये प्रति तोळा आहे. तर सिल्व्हर फ्यूचरमध्ये देखील आज घसरण झाली आहे. डिसेंबरच्या चांदीची किंमत 1.43 टक्क्यांच्या घसरणीनंतर 59920 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली आहे. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 46240 रुपये प्रति तोळा आहे. तर मुंबईमध्ये 22  कॅरेट सोन्याचा दर 45240 रुपये प्रति तोळा आहे. नागपुरात 24 कॅरेट सोन्याचा दर 46240 रुपये प्रति तोळा असून 24 कॅरेटचा भाव 45240 रुपये प्रति तोळा आहे. हे वाचा-या तारखेपर्यंत मिळणार PM Kisan चा 10वा हप्ता, खात्यात येणार 2000 रुपये काय आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात Gold Rate आंतरराष्ट्रीय बाजारातही आज दर कमी झाले आहेत. याठिकाणी स्पॉट गोल्डची किंमत 0.3 टक्क्यांच्या घसरणीनंतर 1,762.33 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. गुंतवणुकीची योग्य संधी तज्ज्ञांच्या मते, एमसीएक्सवर सोन्याचे दर 46800-47055 रुपयांच्या आसपासच राहतील. तर चांदीचे दर 61000-61400 रुपयांच्या स्तरावर राहण्याची शक्यता आहे. मार्केट तज्ज्ञांच्या मते सोन्यामध्ये गुंतवणुकीची ही योग्य संधी आहे. हे वाचा-Pensioners ना आता No Tension! घरबसल्या जमा करता येईल वार्षिक जीवन प्रमाणपत्र मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही  www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

    पुढील बातम्या