नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर: आता लग्नसराईचा काळ (Wedding Season in India) सुरू होत आहे. या काळात भारतात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. मात्र सोनं खरेदी करणं सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. कारण सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर ₹49,000 प्रति तोळाच्या स्तरापेक्षा जास्त राहिल्यानंतर गुरुवारी सोन्याचा भाव 9 महिन्याच्या सर्वोच्च स्तरावर होता, हा दर ₹49,292 प्रति तोळा आहे. तर अखेच्या व्यवहाराच्या सत्रात एमसीएक्सवर चांदीची किंमत (Silver price Today) 0.27 टक्क्यांनी वाढली आहे, त्यानंतर दर 67,148 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीच्या किमती वर्षाच्या अखेरीपर्यंत वाढत राहतील. त्यांच्या मते, जागतिक चलनवाढ आणि सोन्या-चांदीचा औद्योगिक वापर पुढील काही महिने कायम राहील. 2021 च्या अखेरीस या दोन्ही धातूंमध्ये मोठी उसळी अपेक्षित आहे. तज्ज्ञांच्या मते, MCX वर सोन्याची किंमत ₹ 51,000 प्रति तोळापर्यंत जाऊ शकते, तर चांदीची किंमत या वर्षाच्या अखेरीस ₹ 72,000 ते ₹ 74,000 प्रति किलोपर्यंत पोहोचू शकते. हे वाचा- Paytm IPO: एका झटक्यात पेटीएमचे कर्मचारी मालामाल; 350 जणं होणार कोट्यधीश 51,000 पर्यंत पोहोचणार सोनं या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा भाव ₹50,000 ते ₹51,000 प्रति 10 ग्रॅम पर्यंत जाऊ शकतो तर चांदीच्या किमती MCX वर ₹72,000 ते ₹74,000 प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती आयआयएफएल सिक्युरिटीजचे कमोडिटी अँड करन्सी ट्रेडचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी दिली आहे. त्यांच्या मते, वाढती जागतिक चलनवाढ, कमकुवत यूएस डेटा, सोन्या-चांदीची वाढती औद्योगिक मागणी आणि सराफामधील गुंतवणुकीची मागणी यामुळे सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. पुढील काही महिन्यांपर्यंत हे ट्रिगर्स असतील अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतीतील ही तेजी या वर्षाच्या अखेरीपर्यंत कायम राहण्याची अपेक्षा आहे. हे वाचा- 2 वर्षात एका लाखाचे बनले 4 कोटी! 35 पैशांचा हा शेअर पोहोचला 146 रुपयांवर काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं? स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे अभिषेक चौहान म्हणाले की, जगभरातील पुरवठ्यात येणाऱ्या अडचणींमुळे महागाईत वाढ झाली आहे. अन्नधान्य, खाद्यतेल, धातू, वीजपुरवठा यासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. पुरवठ्यामध्ये निर्माण होणाऱ्या या अडचणी लवकर दूर होतील अशी अपेक्षा नाही. ही मागणी पूर्ण होण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. पँडेमिकपूर्वी हे सर्व काही सामान्य होते, पण आता औद्योगिक वापर देखील वाढल्याने सोन्यासह चांदीच्या किंमती वाढू शकतात. या वाढीमुळे सोनं नवीन उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.