नवी दिल्ली, 26 जून: सध्या 2000 रुपयांची नोट (2000 Rupees Note) फार कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे. बॅंका (Bank) किंवा एटीएममधून (ATM) 500 रुपयांच्या नोटा (500 Rupees Note) मोठ्या प्रमाणावर मिळत आहेत. याचा अर्थ सध्या देशातल्या चलनातली सर्वांत मोठ्या रकमेची नोट 500 रुपयांची आहे, असं म्हणता येईल. ही बातमी सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची अशी म्हणता येईल. सध्या सोशल मीडियावर (Social Media) 500 रुपयांच्या नोटेच्या अनुषंगाने एक पोस्ट जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. ज्या 500 रुपयांच्या नोटेवर हिरवी पट्टी आरबीआय गर्व्हनर यांच्या सहीजवळ नसून, ती महात्मा गांधी यांच्या फोटोजवळ असेल, तर अशी नोट स्वीकारू नये, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. सत्य काय आहे? पीआयबी फॅक्ट चेकमध्ये (PIB Fact Check) ही बाब खोटी असल्याचं सिद्ध झालं आहे. आरबीआयने (RBI) दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या दोन्ही नोटांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि या दोन्ही नोटांना मान्यता आहे. त्यामुळे पीआयबी फॅक्ट चेकने हे दावे खोटे असल्याचं सांगितलं आहे. वर नमूद केलेल्या प्रकारची 500 रुपयांची नोट तुमच्याकडे असेल, तर घाबरण्याचं काहीही कारण नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या चुकीच्या बातम्या, पोस्ट यांमुळे लोकांचं नुकसान होऊ नये यासाठी पीआयबीकडून वेळोवेळी त्या विषयांची सत्य माहिती स्पष्ट केली जाते.
दावा: ₹500 का वह नोट नहीं लेना चाहिए जिसमें हरी पट्टी आरबीआई गवर्नर के सिग्नेचर के पास न होकर गांधीजी की तस्वीर के पास होती है।#PIBFactCheck: यह दावा #फ़र्ज़ी है। @RBI के अनुसार दोनों ही तरह के नोट मान्य होते हैं।
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 25, 2021
अधिक जानकारी के लिए यहाँ जाएं: https://t.co/DuRgmS0AkN pic.twitter.com/2buOmR4iIv
5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार? यापूर्वी अशा प्रकारचे करण्यात आलेले दावे खोटे असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. यापैकी एका दाव्यानुसार, 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार असं सांगण्यात येत होतं. याविषयीची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली, तेव्हा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोकडून ट्विट करण्यात आलं. हा मेसेज चुकीचा असून, असा कोणताही निर्णय आरबीआयने घेतला नसल्याचं त्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं होतं. 5,10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा बंद होण्याबाबतची माहिती पूर्णतः खोटी आहे. जुन्या आणि नव्या अशा दोन्ही नोटा चलनात राहणार असल्याचंही यात नमूद करण्यात आलं होतं. हे वाचा- विजय मल्ल्याला मोठा झटका! SBI कंसोर्टियमने वसुल केलं 5824.5 कोटींचं कर्ज 500 रुपयांची नोट खरी हे कसं ओळखाल? 1) ही नोट प्रकाशासमोर ठेवल्यास त्यावर तुम्हाला 500 असं लिहिलेलं दिसेल. 2) डोळ्यासमोर नोट 45 अंशांच्या कोनामध्ये धरल्यास तुम्हाला 500 असं लिहिलेलं दिसेल. 3) देवनागरीत (Devnagri) 500 असं लिहिलेलं दिसेल 4) जुन्या नोटांच्या तुलनेत नव्या नोटेवर महात्मा गांधी यांच्या छायाचित्राचं ओरिएंटेशन आणि पोझिशन थोडी वेगळं आहे. 5) नोट हलकी मोडल्यास सुरक्षा थ्रेडचा रंग हिरव्याऐवजी निळा दिसू लागतो. 6) जुन्या नोटेच्या तुलनेत गॅरंटी क्लॉज, गव्हर्नर यांची सही, प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआयचा लोगो उजव्या बाजूला शिफ्ट करण्यात आला आहे. हे वाचा- Gold Outlook: भविष्यात सोनं महागणार की स्वस्त होणार? काय म्हणतायंत तज्ज्ञ 7) या नोटेवर महात्मा गांधी यांचं चित्र आणि इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्क आहे. 8) वरच्या बाजूला उजवीकडे आणि खाली डावीकडे लिहिलेले नंबर डावीकडून उजवीकडे वाढत जातात. 9) येथे 500 या क्रमांकाचा रंग बदलताना दिसतो. म्हणजे हिरवा रंग निळा होतो. 10) या नोटेवर उजवीकडे अशोक स्तंभ आहे. उजवीकडे वर्तुळाकार बॉक्समध्ये 500 असं लिहिलेलं आहे. उजव्या आणि डाव्या बाजूला 5 ब्लीड लाईन असून, त्या ठळक आहेत. नोटेच्या मागील बाजूला… 11) नोटेच्या छपाईची तारीख नमूद करण्यात आली आहे. 12) स्लोगनसह स्वच्छ भारत असा लोगो (Logo) आहे. 13) मध्यभागी भाषेचं पॅनेल आहे. हे वाचा- पर्सनल लोनपेक्षा स्वस्त आणि सहज मिळेल LIC Policy च्या बदल्यात कर्ज, वाचा सविस्तर 14) भारतीय ध्वजासह लाल किल्ल्याचं चित्र आहे. 15) देवनागरीमध्ये 500 असं लिहिलेलं आहे. दृष्टिहीन व्यक्तींसाठी - महात्मा गांधी यांचं चित्र, अशोक स्तंभाचं प्रतीक, ब्लीड लाइन आणि ओळखचिन्ह ठळक आहे.

)







