नवी दिल्ली, 26 जून: गेल्या आठवड्यातील मोठ्या घसरणीनंतर सोन्याच्या किंमतीत (Gold Rates) आता काहीशी सुधारणा पाहायाल मिळते आहे. लाँग टर्म आउटलुक पॉझिटिव्ह आहे मात्र मोठी वाढ होईल अशी शक्यता नाही आहे. चांदीबाबत (Silver Price) बोलायचे झाले तर आधीच्या स्तरापेक्षा खरेदीत वाढ झाली आहे. औद्योगिक मागणी वाढल्यामुळे लाँग टर्ममध्ये चांदीचा आउटलुकही पॉझिटिव्ह आहे.
सोन्यातील व्यवसाय (Gold business)
अनेक आठवड्यांनंतर सोन्यामध्ये खरेदी वाढली आहे. 1 महिन्यात कॉमेक्सवर सोन्याचे दर जवळपास 6.5 टक्क्यांनी घसरले होते. तर डॉलरमध्ये कमजोरीमुळे सोन्याच्या किंमतींना सपोर्ट मिळत आहे. अमेरिकन कामगार बाजारात मंदीची चिन्हं आहेत. यूएस फेडने लवकरच दर वाढवण्यास नकार दिला आहे, ज्यामुळे सोन्यामध्ये दीर्घकालीन आउटलुक सकारात्मक राहिला आहे.
चांदीतील व्यवसाय (Silver business)
सोन्यासह चांदीमध्ये निचांकी स्तरापेक्षा काहीशी जास्त खरेदी पाहायला मिळते आहे. कॉमेक्सवर महिन्याभरात चांदीचा दर सहा टक्क्यांनी घसरला आहे. तर डॉलरमधील कमजोरीमुळे या किंमतीला सपोर्ट मिळतो आहे. अर्थव्यवस्थेत झालेल्या रिकव्हरीमुळे औद्योगिक मागणी वाढेल आणि लाँग टर्ममध्ये आउटलुक सकारात्मक राहिल.
हे वाचा-पाच तासांनंतर कर्मचाऱ्यांना कामामध्ये ब्रेक आवश्यक- मोदी सरकार बदलणार नियम?सोन्याने 28 टक्के परतावा दिला (Gold Investment & Return )
सोन्याच्या गुंतवणूकीबद्दल बोलायचे झाले तर गेल्या वर्षी सोन्याने 28 टक्के परतावा दिला आहे. त्या आधीच्या वर्षीही सोन्याने दिलेला परतावा सुमारे 25 टक्के होता. जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असाल तर सध्या सोनं गुंतवणूकीसाठी एक अतिशय सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे, जो चांगला परतावा देईल. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्याची किंमत वाढेल, म्हणून तुमच्यासाठी ही चांगली गुंतवणूक संधी आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.