नवी दिल्ली, 26 जून: बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून देशाबाहेर पळून गेलेल्या विजय मल्ल्याला (Vijay Mallya) आणखी एक धक्का बसला आहे. ईडीने शुक्रवारी सांगितले की विजय मल्ल्याला कर्ज देणाऱ्या एसबीआयच्या (State Bank of India) नेतृत्वातील बँकांच्या कन्सोर्टियमला 5,824.5 कोटी रुपये हस्तांतरित केले गेले.
केंद्रीय तपास यंत्रणेनं अशी माहिती दिली आहे की ही रक्कम अँटी मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत यूनाइटेड ब्रेव्हरीज लिमिटेड (यूबीएल) चे जप्त असणारे शेअर विकून मिळाली आहे. मल्ल्यावर अनेक बँकांकडून घेतलेलं एकूण 9000 कोटींचं कर्ज थकवल्याचा आरोप आहे.
डेट रिकव्हरी ट्रिब्यूनल (DRT) ने 23 जून रोजी या शेअर्सची विक्री केली होती, जेव्हा ईडीने यूबीएलचे जवळपास 6,624 कोटी रुपयांचे शेअर्स एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांना हस्तांतरीत केले होते.
हे वाचा-पुन्हा वाढली आधार-पॅन लिंक करण्याची मुदत, जाणून घ्या नवी तारीख
ईडीने हे शेअर्स प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट कोर्ट (पीएमएलए कोर्ट) अंतर्गत जोडले होते. ईडीने ट्वीट केलं की, 'आज एसबीआयच्या नेतृत्त्वात असलेल्या बँकांना त्यांच्या खात्यात 5824.5 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. ही रक्कम यूबीएलच्या समभागांची विक्री करुन करण्यात आली आहे. 23 जून 2021 रोजी ही विक्री करण्यात आली होती.'
याआधी ईडीने 800 कोटी रुपयांचे बाकी शेअर 25 जूनपर्यंत विकून SBI च्या नेतृत्वाखालील बँकांना दिले जाण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. फरार उद्योजक नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि मल्ल्या यांनी केलेल्या फसवणुकीच्या प्रकरणांमधील फसवणुकीची 40 टक्के रक्कम वसूल झाली असल्याचे तपास यंत्रणेनं बुधवारी सांगितलं होतं.
हे वाचा-PMC बँकेच्या निर्बंधात सहा महिन्यांची वाढ, RBIनं दिलं 'हे' कारण9000 कोटींपेक्षाही जास्त थकबाकी
ब्रिटनला पळून गेलेल्या मल्ल्याविरूद्ध ईडी आणि सीबीआय 9,000 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याची चौकशी करीत आहेत. हा घोटाळा त्याच्या बंद झालेल्या किंगफिशर एअरलाइन्सच्या संचालनाशी संबंधित आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.