Home /News /money /

तुमचे पैसे सुरक्षित ठेवा, RBI ने जारी केले ATM आणि क्रेडिट कार्डांचे नवे नियम

तुमचे पैसे सुरक्षित ठेवा, RBI ने जारी केले ATM आणि क्रेडिट कार्डांचे नवे नियम

ATM सेंटरवर पैसे काढताना सावधगिरी बाळगावी लागते. नाहीतर फसवणूक होण्याची शक्यता आहे. अशी फसवणूक होऊ नये म्हणून RBI ने नवे नियम जारी केले आहेत.

    नवी दिल्ली, 15 जानेवारी : ATM सेंटरवर पैसे काढताना सावधगिरी बाळगावी लागते. नाहीतर फसवणूक होण्याची शक्यता आहे. अशी फसवणूक होऊ नये म्हणून RBI ने नवे नियम जारी केले आहेत. भारतात कार्ड जारी करताना ATM आणि PoS वर फक्त डोमेस्टिक कार्ड वापरण्याची परवानगी द्यावी, असं RBI ने म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या व्यवहारासाठी वेगळी परवानगी घ्यावी लागेल, असंही RBI ने म्हटलं आहे. याशिवाय ऑनलाइन व्यवहार, कार्डशिवाय केलेले व्यवहार, कॉन्टॅक्टसेस व्यवहार यासाठी ग्राहकाला आपल्या कार्डावरच्या सेवा सेट कराव्या लागतील. हा नवा नियम 16 मार्च 2020 पासून सगळ्या कार्डांसाठी लागू होईल. जुनी कार्ड असलेले ग्राहक यापैकी कोणत्या सेवा घ्यायच्या आणि कोणत्या नाही याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात. (हेही वाचा : मोठी बातमी : या तारखेला बँकांचा 2 दिवसांचा संप, तुमची कामं करा पूर्ण) ही घ्या खबरदारी ATM मधून पैसे काढणं हे तसं नेहमीचंच पण अशा वेळी खबरदारी घेतली नाही तर तुमचं बँक खातं रिकामं होण्याचा धोका आहे. ऑनलाइन फ्रॉडच्या शक्यतेमुळे तर जास्तच सावध राहावं लागतं. ATM मध्ये सगळ्यात जास्त धोका कार्ड क्लोनिंगमुळे निर्माण होतो.तुमच्या कार्डमधून पूर्ण माहिती चोरून तुमचं दुसरं कार्ड बनवणं याला कार्ड क्लोनिंग म्हणतात. (हेही वाचा : जगातला हा सर्वात श्रीमंत माणूस भारतात गुंतवणार 7 हजार कोटी रुपये) अशी होते माहितीची चोरी ATM मध्ये घातलेल्या कार्डवरून हॅकर कोणत्याही युडरचा डेटा चोरू शकतो. हे लोक ATM च्या कार्ड स्लॉटमध्ये असं एक डिव्हिइस लावतात की जे तुमच्या कार्डची सगळी माहिती स्कॅन करू शकतात. यानंतर ब्लू टूथ किंवा दुसरं वायरलेस डिव्हाइसमधून तुमचा डेटा चोरला जातो. तुम्ही ATM सेंटरमध्ये गेल्यावर ATM मशिनच्या कार्ड स्लॉटवर लक्ष द्या. कार्ड स्लॉटमध्ये काही गडबड आढळली तर त्याचा वापर करणं टाळा. ===========================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: ATM, Money

    पुढील बातम्या