जगातला हा सर्वात श्रीमंत माणूस भारतात गुंतवणार 7 हजार कोटी रुपये

जगातला हा सर्वात श्रीमंत माणूस भारतात गुंतवणार 7 हजार कोटी रुपये

अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्याकडे 11 हजार 600 कोटी डॉलर्सची संपत्ती आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनाही त्यांनी श्रीमंतीच्या बाबतीत मागे टाकलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जानेवारी : जगातली प्रमुख ई कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने (Amazon)भारतातल्या डिजिटल उपक्रमांसाठी 7 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस (Jeff Bezos)यांनीच हे जाहीर केलं. जेफ बेझोस म्हणाले, आमची कंपनी जागतिक स्तरावर 2025 पर्यंत 10 अब्ज डॉलरच्या मेक इन इंडिया उत्पादनांची निर्यात करेल. भारतातल्या लघु आणि मध्यम प्रकल्पांबद्दल जागरुकता निर्णाण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं ते म्हणाले.

(हेही वाचा : मोदी सरकारचा नवा प्लॅन, उपचारासाठी 15 लाख रुपयांपर्यंत करणार मदत)

एकविसाव्या शतकात भारत आणि अमेरिकेचे संयुक्त प्रयत्न जास्त महत्त्वाचे ठरतील, असंही त्यांनी सांगितलं. जेफ बेझोस या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. ते भारतातले मुख्य सरकारी अधिकारी, उद्योगपती आणि SMB उद्योजकांच्या भेटी घेतील.

जगभरात सर्वात श्रीमंत

अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्याकडे 11 हजार 600 कोटी डॉलर्सची संपत्ती आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनाही त्यांनी श्रीमंतीच्या बाबतीत मागे टाकलं आहे. अ‍ॅमेझॉनच्या शेअरमध्ये आलेल्या तेजीमुळे जेफ बेझोस सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनले.

(हेही वाचा : घर शोधताय? मग दुसरीकडे कुठे जायची गरज नाही, सरकारने सुरू केली नवी सेवा)

1994 मध्ये सुरू केली कंपनी

जेफ बेझोस यांनी जुलै 1994 मध्ये अ‍ॅमेझॉन कंपनीची स्थापना केली आणि 1995 मध्ये ही कंपनी सुरू झाली. ते आधी या कंपनीचं नाव केडेब्रा डॉट कॉम असं ठेवणार होते पण 3 महिन्यांनी त्यांनी याचं नाव बदलून अ‍ॅमेझॉन डॉट कॉम असं ठेवलं.

अ‍ॅमेझॉन नदीचं ठेवलं नाव

जेफ बेझोस यांनी कंपनीचं नाव अ‍ॅमेझॉन ठेवलं कारण त्यांना आपल्या कंपनीला जगातली सगळ्यात मोठी कंपनी बनवायचं होतं. त्यांची वेबसाइट ऑनलाइन बुकस्टोअरच्या स्वरूपात सुरू होईल, असं त्यांना वाटलं होतं. त्यानंतर ते डीव्हीडी, सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, कपडेही विकले.

===========================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: January 15, 2020, 4:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading