नवी दिल्ली, 15 जानेवारी : इंडियन बँक असोसिएशनने या महिन्यात दुसऱ्यांदा संपाचं आवाहन केलं आहे. IBA 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला संप करणार आहे. याआधी जानेवारी महिन्यात 8 तारखेला झालेल्या बंदमध्ये 6 बँक कर्मचारी संघटना सामील झाल्या होत्या. त्यादिवशी बहुतेक बँका बंद होत्या आणि ज्या बँका सुरू होत्या त्यांच्या कामकाजावरही बंदचा परिणाम झाला.
1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प
यावेळी घोषित केलेला बंद महत्त्वाचा आहे कारण 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याआधी एक दिवस 31 जानेवारीला आर्थिक सर्वेक्षण अहवाल येईल. अर्थसंकल्पाची तयारी अगदी शेवटच्या टप्प्यात आहे आणि सरकारसमोर आर्थिक मंदीचं मोठं आव्हान आहे. या अर्थसंकल्पात सरकार काय घोषणा करतं याबदद्लही सगळ्यांना उत्सुकता आहे.
(हेही वाचा : जगातला हा सर्वात श्रीमंत माणूस भारतात गुंतवणार 7 हजार कोटी रुपये)
सलग 3 दिवस बँका बंद राहणार
31 जानेवारीला शुक्रवार आहे. त्यानंतर 1 फेब्रुवारीला शनिवार आणि मग रविवार असल्याने बँका 3 दिवस बंद राहतील. बँका बंद राहिल्याने ATM मध्ये कॅशचीही चणचण जाणवेल.बँक कर्मचारी आणि अधिकारी संपात सहभागी झाले तर त्याचा बँकिंग सेवांवर मोठा परिणाम होईल. बँकांच्या अनेक शाखा बंद राहण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा : Gold Rates Today : सोन्याच्या किंमतींमध्ये आली तेजी,आजपासून हा नवा नियम)
यामुळे अनेक ठिकाणी ATM सेवांवरही परिणाम होऊ शकतो पण बँकेचं काम सुरळित राहील, अशीही शक्यता आहे. कारण NEFT चे ऑनलाइन व्यवहार आता 24X7 उपलब्ध आहेत. बँक कर्मचाऱ्यांच्या संपाच्या या तारखा लक्षात घेऊनच या महिन्यात बँकेच्या व्यवहारांचं नियोजन करावं लागणार आहे.
========================================================================================