जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ...तर बँकेकडून रोज तुम्हाला मिळतील 500 रुपये, RBI च्या नव्या गाईडलाईनमुळे ग्राहकांना मोठा दिलासा

...तर बँकेकडून रोज तुम्हाला मिळतील 500 रुपये, RBI च्या नव्या गाईडलाईनमुळे ग्राहकांना मोठा दिलासा

...तर बँकेकडून रोज तुम्हाला मिळतील 500 रुपये, RBI च्या नव्या गाईडलाईनमुळे ग्राहकांना मोठा दिलासा

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड बंद करताना बँक किंवा कंपनी मनमानी करत असल्याचा अनुभव कदाचित तुम्हालाही आला असेल. मात्र यापुढे ग्राहकांना ही मनमानी सहन करावी लागणार नाही. तसं झाल्यास बँकेकडूनच दंड वसूल केला जाईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 एप्रिल : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँक आणि कंपन्यांसाठी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड जारी करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे (RBI New Guidelines for Credit and Debit card) जारी केली आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वांद्वारे ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. क्रेडिट आणि डेबिट कार्ड जारी केल्यानंतर कंपन्यांनी मनमानी केल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही वर्षांत समोर आली आहेत. हीच बाब लक्षात घेत अशा घटना रोखण्यासाठी RBI ने कठोर पावलं उचलली आहेत. एबीपी न्यूज ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड बंद करताना बँक किंवा कंपनी मनमानी करत असल्याचा अनुभव कदाचित तुम्हालाही आला असेल. यासंबंधित तक्रार अनेक वेळा ग्राहक करतात. कार्ड बंद होण्यास उशीर होत असल्याने ग्राहकांना काही वेळा मोठा दंड भरावा लागतो. अशा परिस्थितीत आता ग्राहकांच्या विनंतीवरून RBI ने क्रेडिट आणि डेबिट कार्ड 7 दिवसांच्या आत बंद करणे बंधनकारक केले आहे. तसे न केल्यास प्रतिदिन 500 रुपये दंड आकारला जाईल. नवीन मार्गदर्शक तत्त्वे 1 जुलै 2022 पासून लागू केली जातील. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सर्व सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयीकृत बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय संस्था (NBFCs) यांना RBI ने बनवलेल्या या नियमांचे पालन करावे लागेल. राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि पेमेंट बँकांना ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू होणार नाहीत. वैयक्तिक माहिती शेअर करा आणि 6000 रुपये मिळवा! पोस्टाची ऑफर किती खरी? वाचा सविस्तर कार्ड बंद झाल्याची माहिती ईमेल आणि मोबाईलवर द्यावी लागेल आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर कार्डधारकाने सर्व बिले भरली, तर ग्राहकाच्या विनंतीनुसार कंपनी किंवा बँकेला 7 दिवसांच्या आत कार्ड बंद करावे लागेल. असे न केल्यास, 7 दिवसांनंतर, बँकेला ग्राहकाला दररोज 500 रुपये दंड भरावा लागेल. यासोबतच बँकेला क्रेडिट आणि डेबिट कार्ड बंद झाल्याची माहिती ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडीवर लवकरात लवकर पाठवावी लागेल. खाद्य तेलामुळे घराचं बजेड बिघडणार? तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता; काय आहेत कारणे या कारणामुळे ग्राहकाचे क्रेडिट कार्ड बंद होऊ शकते जर एखाद्या व्यक्तीने एक वर्ष क्रेडिट कार्डचा सतत वापर केला नाही तर अशा परिस्थितीत बँक त्याचे कार्ड बंद करू शकते. परंतु, असे करण्यापूर्वी बँक ग्राहकाला माहिती देईल. मेसेज पाठवल्यानंतर 30 दिवसांच्या आत ग्राहक प्रतिसाद देत नसेल किंवा कार्ड वापरत नसेल, तर अशा स्थितीत बँक ग्राहकाचे क्रेडिट कार्ड बंद करू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात