जाहिरात
मराठी बातम्या / मनी / वैयक्तिक माहिती शेअर करा आणि 6000 रुपये मिळवा! पोस्टाची ऑफर किती खरी? वाचा सविस्तर

वैयक्तिक माहिती शेअर करा आणि 6000 रुपये मिळवा! पोस्टाची ऑफर किती खरी? वाचा सविस्तर

वैयक्तिक माहिती शेअर करा आणि 6000 रुपये मिळवा! पोस्टाची ऑफर किती खरी? वाचा सविस्तर

लोकांना वैयक्तिक तपशील शेअर करण्याच्या बदल्यात 6000 रुपये जिंकण्याची ऑफर दिली जात आहे. हा लकी ड्रॉ इंडिया पोस्टद्वारे काढला जात असल्याचा दावा केला जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 एप्रिल : ऑनलाईन जगात सायबर गुन्हेगार (Cyber Crime) फसवणुकीसाठी कोणता पर्याय शोधून काढतील याचा काही नेम नाही. त्यामुळे आपम सावध राहणे महत्वाचे आहे. भारतीय पोस्ट खात्याचा (Indian Post Office) बनावट लकी ड्रॉ (Lucky Draw) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये लोकांना वैयक्तिक तपशील शेअर करण्याच्या बदल्यात 6000 रुपये जिंकण्याची ऑफर दिली जात आहे. हा लकी ड्रॉ इंडिया पोस्टद्वारे काढला जात असल्याचा दावा केला जात आहे. पण यात काहीही तथ्य नाही. भारतीय पोस्टने असा कोणताही लकी ड्रॉ आयोजित केलेला नाही. त्यामुळे खोट्या लकी ड्रॉला बळी पडू नका. PIB फॅक्ट चेकने लकी ड्रॉवर बनावट अलर्ट जारी केला आहे. PIB फॅक्ट चेक म्हणते की हा घोटाळा आहे आणि त्याचा भारतीय पोस्टशी काहीही संबंध नाही. त्यामुळे तुम्हालाही इंडियन पोस्टच्या लकी ड्रॉच्या नावाने मेसेज आला तर त्यात अडकून तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका.

जाहिरात

तुमच्या ‘ड्रीम होम’च्या निर्मितीचा खर्च वाढणार, सिमेंट किती रुपयांनी महागणार? यापूर्वी एक नियुक्ती पत्र व्हायरल झाले होते यापूर्वी उत्पादन शुल्क मंत्रालयाच्या (Excise Ministry) नावाने नियुक्तीपत्र (appointment letter) व्हायरल झाले होते. अर्जदाराची फील्ड वितरण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याचा दावा पत्रात करण्यात येत होता. त्या बदल्यात अर्जाची फी मागितली जात होती. पीआयबी फॅक्ट चेकने हे नियुक्ती पत्रही बनावट असल्याचे म्हटले आहे आणि भारत सरकारच्या अंतर्गत उत्पादन शुल्क मंत्रालय नसल्याचे म्हटले आहे.

क्या बात है! IDBI बँक ग्राहकांसाठी खूशखबर! या योजनेच्या व्याज दरात मोठी वाढ; जाणून घ्या अधिक सरकारशी संबंधित कोणतीही बातमी खरी की खोटी हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. PIB फॅक्ट चेक केंद्र सरकारच्या धोरणे/योजना/विभाग/मंत्रालयांबद्दल चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कार्य करते. कोणीही संशयास्पद बातम्यांचा स्क्रीनशॉट, ट्वीट, फेसबुक पोस्ट किंवा URL 918799711259 WhatsApp क्रमांकावर PIB Fact Check वर पाठवू शकतो किंवा pibfactcheck@gmail.com वर मेल करू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात