मुंबई, 23 एप्रिल : सर्वसामान्य नागरिक आधीच महागाईच्या (Inflation) झळा सोसत आहेत. त्यामुळे कुठेतरी खिशाचा भार कमी करण्यासाठी ते सरकार कुठून दिलासा मिळेल का याची वाट पाहत आहेत. मात्र दिलासा मिळण्याऐवजी महागाईचा भार आणखी वाढत आहेत. त्यात आता खाद्य तेलाच्या किमती (Edible oil Prices) वाढण्याची शक्यता समोर आल्याने सर्वसामन्यांचं टेन्शन आणखी वाढलं आहे. इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा पाम तेल (Palm Oil) उत्पादक देश आहे. असे असूनही तो पाम तेलाच्या संकटाशी झुंज देत आहे. सध्या इंडोनेशिया प्रचंड महागाईने होरपळत आहे. पामतेलाचे भाव तिथे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वाढत्या देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी खाद्य तेल आणि त्याच्या कच्च्या मालाची शिपमेंट थांबवण्याची घोषणा केली आहे. यानंतर इंडोनेशियाने 28 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. जोको विडोडो म्हणाले की, या धोरणाचा उद्देश घरपोच खाद्यपदार्थांची उपलब्धता सुनिश्चित करणे आहे. मी या धोरणाच्या अंमलबजावणीचे निरीक्षण आणि मूल्यमापन करीन जेणेकरून देशांतर्गत बाजारात स्वयंपाकाच्या तेलाची उपलब्धता मुबलक आणि परवडणारी होईल. वैयक्तिक माहिती शेअर करा आणि 6000 रुपये मिळवा! पोस्टाची ऑफर किती खरी? वाचा सविस्तर जागतिक बाजारपेठेत किंमती वाढू शकतात इंडोनेशियाने बंदी जाहीर केल्यानंतर यूएस सोया ऑइल फ्युचर्सने 3 टक्क्यांहून अधिक उसळी मारून 84.03 सेंट्स प्रति पौंड या विक्रमी उच्चांकावर झेप घेतली. ट्रेड बॉडी सॉल्व्हेंट अॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) चे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की हे पाऊल पूर्णपणे अनपेक्षित आणि दुर्दैवी होते. या निर्णयामुळे केवळ भारतातील सर्वात मोठा खरेदीदारच नव्हे तर जागतिक स्तरावरील ग्राहकांनाही त्रास होईल, कारण पाम हे जगातील सर्वाधिक खपत असलेले तेल आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहेत की इंडोनेशियाच्या या निर्यात बंदीमुळे भारताला दर महिन्याला 40 लाख टन पाम ऑईलचं नुकसान होईल. रशिया युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) सनफ्लॉअर ऑईलचा पुरवठा एक लाख टन प्रति महिने घट झाली आहे. अशा स्थितीत भारतातील खाद्य तेल संपूर्ण गणित बिघडवू शकते. तुमच्या ‘ड्रीम होम’च्या निर्मितीचा खर्च वाढणार, सिमेंट किती रुपयांनी महागणार? जानेवारीतही बंदी घालण्यात आली होती यापूर्वी जानेवारीमध्ये इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली होती, मात्र मार्चमध्ये ही बंदी उठवण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.