जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पुन्हा EMI आणि होम लोन वाढणार? RBI ची आज महत्त्वपूर्ण बैठक

पुन्हा EMI आणि होम लोन वाढणार? RBI ची आज महत्त्वपूर्ण बैठक

पुन्हा EMI आणि होम लोन वाढणार? RBI ची आज महत्त्वपूर्ण बैठक

काही दिवसांपूर्वी US फेडर बँकेनं 0.75 टक्क्यांनी व्याजदरात वाढ केल्यानंतर RBI ने देखील आपल्या रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांनी वाढ केली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियोजन करत आहे. US फेडर बँकेनं पुन्हा सलग चौथ्यांदा व्याजदर वाढवलं आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी 0.75 टक्क्यांनी ही वाढ करण्यात आली आहे. याचा आज आंतरराष्ट्रीय मार्केटसह आशियातील शेअर मार्केटवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी US फेडर बँकेनं 0.75 टक्क्यांनी व्याजदरात वाढ केल्यानंतर RBI ने देखील आपल्या रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांनी वाढ केली. त्यानंतर EMI आणि कर्ज महाग झाले होते. कर्जासाठी लोकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. तर डिसेंबरपर्यंत पुन्हा एकदा रेपो रेट वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. वाढत्या महागाईसंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (आरबीआय) विशेष एमपीसी बैठक होणार आहे. गुरुवारी होणाऱ्या या बैठकीत महागाईवर नियंत्रण कसं मिळवता येईल यावर चर्चा होणार आहे. महागाईवर आरबीआयची नजर आहे. महागाई झपाट्याने वाढत असताना शक्तिकांत दास यांचे हे विधान आले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने आरबीआयकडून याबाबत अहवाल मागवला आहे.

RBI ची मोठी कारवाई, वक्रांगी लिमिटेडला ठोठावला 1.76 कोटी रुपयांचा दंड

US फेडरल रिझर्व्ह बँकेनं आताची केलेली व्याजदरातील वाढ ही सर्वोच्च असल्याचं सांगितलं जात आहे. 2008 पासून ही सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एकीकडे मंदीचं सावट आहे. त्यामुळे तणावाचं वातावरण आहे. US फेडरलच्या निर्णयाचा इतर बँकांवर काय परिणाम होणार हे देखील पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हातात पैसे ठेवायची गरज नाही! RBI कडून Digital Rupee ची सुरुवात

RBI ने पुन्हा जर महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेपो रेटमध्ये वाढ केली तर EMI आणि व्याजदरात वाढ होऊ शकते. त्यामुळे कर्जासाठी लोकांना जास्तीचे पैसे मोजावे लागू शकतात. EMI साठी देखील बँक जास्तीचे पैसे घेऊ शकते.

News18लोकमत
News18लोकमत

त्यामुळे लोकांचा लोन घेण्याकडे कल कमी होऊ शकतो. घर, गाडी किंवा पर्सनल कारणांसाठी लोन घेणं अवाक्याबाहेरचं होऊ शकतं. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या आजच्या बैठकीकडे लक्ष असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात