जाहिरात
मराठी बातम्या / मनी / RBI ची मोठी कारवाई, वक्रांगी लिमिटेडला ठोठावला 1.76 कोटी रुपयांचा दंड

RBI ची मोठी कारवाई, वक्रांगी लिमिटेडला ठोठावला 1.76 कोटी रुपयांचा दंड

 बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवारी वक्रांगी लिमिटेडला मोठा दंड ठोठावला आहे.

बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवारी वक्रांगी लिमिटेडला मोठा दंड ठोठावला आहे.

बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवारी वक्रांगी लिमिटेडला मोठा दंड ठोठावला आहे.

  • -MIN READ Trending Desk Delhi,Delhi
  • Last Updated :

     नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर : देशातील मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतीच मोठी कारवाई केली आहे. बँकेने देशभरातील अनेक बँकांना लाखो रुपयांचे दंड ठोठावले आहेत. बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याचा सर्वांत मोठा फटका वक्रांगी लिमिटेडला बसला आहे. कारण बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवारी वक्रांगी लिमिटेडला मोठा दंड ठोठावला आहे.

    आरबीआयने याबाबत प्रसिद्धी पत्रक काढलं आहे. त्यात बँकेनी म्हटलंय, विविध नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल वक्रांगी कंपनीला 1.76 कोटी रुपयांचा तसंच इतर अनेक वित्तीय संस्थांना दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने सांगितलं की व्हाईट लेबल एटीएम (WLA) निर्देशांच्या काही तरतुदींचं पालन न केल्याबद्दल वक्रांगी लिमिटेडला 1,76 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

    (प्रसिद्ध चिनी कंपनीने भारतातील इतर व्यवसाय केले बंद; आता फक्त…)

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं की बँकेने जम्मू आणि काश्मीर स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दुसरीकडे, मुंबईतील दि प्रताप को-ऑपरेटिव्ह लिमिटेडला 6 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स आणि म्हैसूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला प्रत्येकी 5-5 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

    उत्तर प्रदेशमधील महाराजगंज येथील नगर सहकारी बँक लिमिटेडला 4 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर, कर्नाटकमधील द सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लि. आणि उत्तर प्रदेशमधील बांदा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. यांना प्रत्येकी 2-2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.

    ग्राहकांवर काय परिणाम होईल?

    ही कारवाई रेग्युलेटरी कम्प्लायन्समधील कमतरतांवर आधारित आहेत. याचा ग्राहकांशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या ग्राहकांसोबत कोणत्याही संस्थेने केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर या कारवाईमुळे कोणताही परिणाम होणार नाही, असं रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटलं आहे.

    (EPF खात्यातून पैसे काढले तरी TDS कापला जाणार नाही, वापरा ‘हे’ 5 सोपे मार्ग)

    दरम्यान, या पूर्वीही अनेकदा रिझर्व्ह बँकेने देशातील बँकांना नियमांचं पालन न केल्याने दंड ठोठावला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला मोगविरा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबईला KYC नियमांशी संबंधित काही निर्देशांचं पालन न केल्याबद्दल 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तसंच वसई जनता सहकारी बँक, पालघरलाही दोन लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला होता. याशिवाय, RBI ने राजकोट पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक, राजकोटला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात